टी-२० विश्वचषक २०२२ मधील ३० वा सामना आज भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात खेळला जात आहे. हा सामना पर्थ येथे पार पडत आहे. या सामन्यासाठी उतरताच रोहित शर्माने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. रोहित पुरुषांच्या टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू ठरला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात खेळला जात असलेला हा सामना, रोहितच्या टी-२० विश्वचषक कारकिर्दीतील हा ३६ वा सामना आहे. या यादीत रोहितने श्रीलंकेचा माजी फलंदाज तिलकरत्ने दिलशानला मागे टाकले आहे. ज्याने टी-२० विश्वचषकमध्ये ३५ सामने खेळले आहेत.

२००७ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-२० विश्वचषकातही रोहित भारतीय संघाचा भाग होता. भारतासाठी सर्वाधिक टी-२० विश्वचषक खेळण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे. टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत रोहित तिसऱ्या क्रमांकावर आहे.

मात्र, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या सामन्यात त्याची बॅट फारशी तळपली नाही. कारण त्याला १४ चेंडूत एका चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने केवळ १५ धावा करता आल्या. त्याला वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडीने बाद केले.

हेही वाचा – T20 World Cup 2022 : नेदरलॅंड्सविरुद्धच्या सामन्यात मोहम्मद रिझवानने कॉलरवर ‘हा’ खास बिल्ला का लावला होता? घ्या जाणून

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs sa rohit sharma is now the most capped player in the history of the t20 world cup vbm
First published on: 30-10-2022 at 17:45 IST