IND vs SA Virat Kohli Record: आज टी २० विश्वचषकात सुपर १२ च्या सामन्यांमध्ये भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पर्थमध्ये रंगला आहे. रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताचे दोन्ही सलामीवीर म्हणजेच कर्णधार रोहित शर्मा व उपकर्णधार के. एल. राहुल स्वस्तात तंबूत परतले. रोहित झेलबाद झाल्यावर माजी कर्णधार व भारतातील सर्वोत्तम फॉर्ममध्ये असणारा विराट कोहली मैदानावर उतरला. आज पर्थच्या मैदानात विराट कोहलीने टी २० विश्वचषकातील सर्वात मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे. विराट कोहली सुरुवातीच्या १२ च धावांमध्ये टी २० विश्वचषकात १००० धावा पूर्ण केल्या आहेत. मुख्य म्हणजे आपण टॉप ५ फलंदाजांची यादीत पाहिल्यास विराट कोहली यात सर्वात कमी सामने खेळूनही सर्वाधिक धावा करणारा फलंदाज दिसून येत आहे.

टी २० विश्वचषकात आजवर विराट कोहलीने २१ सामने खेळले आहेत. आजचा भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना कोहलीचा २१वा सामना आहे. सुरुवातीच्या ११ धावांमध्ये विराटने तीन चौकार मारले. अवघ्या २१ सामन्यात कोहलीने ९१ च्या रनरेटने १००० धावांचे मोठे टार्गेट पूर्ण केले आहे. विश्वचषकात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये श्रीलंकेचा महेला जयवर्धनेला टॉपला आहे. तर टॉप ५ मध्ये विराटसह रोहित व्हर्टिय कर्णधार रोहित शर्माचा सुद्धा समावेश आहे.

T20 विश्वचषकातील सर्वाधिक धावा

  • महेला जयवर्धने (श्रीलंका)- ३१ सामन्यांत १०१६ धावा
  • विराट कोहली (भारत) – २१ सामन्यात १००१ धावा
  • ख्रिस गेल (वेस्ट इंडिज) – ३३ सामन्यात ९६५ धावा
  • रोहित शर्मा (भारत) – ३५ सामन्यात ९०४ धावा
  • तिलकरत्ने दिलशान (श्रीलंका)- ३५ सामन्यात ८९७ धावा

PAK vs NED: बाबर आझम पुन्हा अपयशी; नेदरलँड विरुद्ध ९२ धावांचं लक्ष्य पण पाकिस्तानी कर्णधार..

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, विराट कोहलीने विक्रम पूर्ण करताच पुढच्या चेंडूला झेलबाद होऊन कोहलीची तंबूत परतला आहे. सुपर १२ मधील गट २ मध्ये सध्या टीम इंडिया टॉपला आहे, आजचा सामना जिंकल्यास रोहित शर्माच्या टीम इंडियाचे उपांत्य फेरीत स्थान निश्चित होईल तर हा सामना भारत हरल्यास पाकिस्तानचे टी २० विश्वचषकातील आव्हान आणखीनच बिकट होणार आहे.