ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या टी२० विश्वचषक २०२२च्या उपांत्य फेरीआधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) तीन दिग्गज खेळाडूंचा ‘आयसीसी हॉल ऑफ फेम’मध्ये समावेश केला आहे. ज्यामध्ये वेस्ट इंडिजचा फलंदाज शिवनारायण चंद्रपॉल, पाकिस्तानचा अब्दुल कादिर आणि इंग्लंडची महिला क्रिकेटपटू चार्लोट एडवर्ड्स यांचा समावेश केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मतदान प्रक्रियेद्वारे निवडलेले तिघेही सध्याच्या आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये सामील होतील. यावेळी पाकिस्तानचे खेळाडू आणि अब्दुल कादिर यांचा मुलगा उस्मान कादिर म्हणाले की, “ही बातमी ऐकून कुटुंबासाठी खूप मोठा सन्मान आहे, आम्ही ही एक मोठी उपलब्धी म्हणून पाहतो, माझे वडील जर आज हयात असते तर त्यांना ही हा पुरस्कार मिळाल्याचे कौतुक वाटले असते. आज ते जिथे असतील तिथेही त्यांना आनंदच झाला असेल.” अब्दुल कादिर यांचे तीन वर्षांपूर्वी निधन झाले पण आताही पाकिस्तानच्या फिरकी गोलंदाजीचा ज्यावेळी उल्लेख केला जातो तेव्हा कादिर यांचे नाव अग्रभागी घेतले जाते. त्याच्या १३ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीबद्दल बोलायचे तर, त्याने ६७ कसोटी सामने, १०४ एकदिवसीय सामने खेळले आणि अनुक्रमे २३६ आणि १३२ बळी घेतले.

हेही वाचा :   भारतीय गोलंदाजांसाठी रोहित, विराट, द्रविड यांनी विमानातील बिझनेस क्लास सीटचा केला त्याग, कारण ऐकून थक्क व्हाल

वेस्ट इंडिजसाठी सर्वाधिक धावा करणारा धावखुरा फलंदाज

सर्वाधिक कसोटी धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत ८व्या क्रमांकावर असलेला शिवनारायण चंद्रपॉल म्हणाला, “मला कुटुंब, मित्र आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे वेस्ट इंडिजच्या क्रिकेट चाहते आणि जगभरातील चाहत्यांसह या क्षणाचा आनंद घ्यायचा आहे ज्यांनी माझ्या संपूर्ण कारकीर्दीतील खेळात भूमिका बजावली आहे. चंद्रपॉलने त्याच्या संघासाठी १६४ कसोटी आणि २६८ एकदिवसीय सामने खेळले. चंद्रपॉल हा त्यांच्या फलंदाजीचे कौशल्यासाठी ओळखला जातो. त्याचा बॅटिंग स्टान्स पाहून भल्याभल्या गोलंदाजांना धडकी भरते. त्याचबरोबर त्याची कसोटीमधील सरासरी व्हीवीएन रिचर्ड्स यांच्यापेक्षा अधिक आहे. रिचर्ड्स यांची कसोटीतील सरासरी ५०.२३ इतकी आहे.

हेही वाचा :  T20 World Cup: ‘हा खेळाडू अपयशी ठरला तर…’ टीम इंडियाच्या फलंदाजीवर सुनील गावसकर नाराज

इंग्लंडला विश्वचषक मिळवून देणारा खेळाडू

२० वर्षांच्या कारकिर्दीत तिच्या नेतृत्वाखाली २००९ मध्ये विश्वचषक जिंकणारा चार्लोट एडवर्ड्स म्हणाली की, “मला माझ्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील प्रत्येक क्षण आनंदात जगली आणि मला आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये सामील केल्यामुळे खूप आनंद झाला आहे. तिने १९९६-१६च्या काळात इंग्लंडकडून २३ कसोटी, १९१ एकदिवसीय आणि ९५ टी२० सामने खेळले. यामध्ये तिने कसोटीमध्ये ४४.१०च्या सरासरीने १६७६ धावा, एकदिवसीय ३८.१६च्या सरासरीने ५९९२ धावा आणि टी२० मध्ये ३२.९७च्या सरासरीने २६०५ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर तिने अष्टपैलू कामगिरी करत ७५ आंतरराष्ट्रीय विकेट्सही घेतल्या आहेत.

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivnarine chanderpaul charlotte edwards and abdul qadir these three stalwarts in the icc hall of fame will be honoured avw
First published on: 08-11-2022 at 13:44 IST