आयसीसी टी२० विश्वचषक २०२२चे यजमानपद सांभाळणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाला आता उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यांचा तिसरा सामना आज दुपारी दीड वाजता इंग्लंडविरुद्ध होणार होता पण पावसामुळे तो लवकर सुरु होईल अशी शक्यता फार कमी आहे.. हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वपूर्ण आहे. दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला असून एका सामन्यात पराभव सुद्धा झाला आहे.

या सामन्याआधी पत्रकारांशी संवाद साधताना कर्णधार अ‍ॅरॉन फिंच म्हणतो, “एमसीजी मैदानावर सामना खेळणे यापेक्षा मोठी गोष्ट असू शकत नाही. जर पावसाचे वातावरण नसेल तर एक सर्वोतम सामना चाहत्यांना बघायला मिळेल. हा ग्रुप पूर्णपणे खुला आहे असे मला वाटते. कोणताही संघ त्यांच्या सामन्याच्या दिवशी जिंकू अथवा हरू शकतो. या खेळात तुम्ही कोणालाच गृहीत धरू शकत नाही. टी२० ची हीच गोष्ट बाकीच्या क्रिकेट प्रकारापासून त्याला वेगळे ठरवते.”

अफगाणिस्तान, श्रीलंका आणि आर्यलँड संघाविषयी बोलताना फिंच म्हणतो की, “हे तीनही संघ अत्यंत कुशल आणि प्रतिभावान आहे. ते त्यांच्या प्रत्येक सामन्यामध्ये जिंकण्याचे सामर्थ्य ठेवतात. या गोष्टीमुळे हा ए ग्रुप सर्वात कठीण ग्रुप मानला जातो. त्याला ग्रुप ऑफ डेथ असेही काही जण म्हणतात.

स्वतःच्या फलंदाजीविषयी बोलताना अ‍ॅरॉन फिंच म्हणतो की,” फलंदाजी करताना मला पूर्वीसारखा स्वतःवर फारसा दबाव जाणवत नाही. स्वतःच्या स्वतःकडून असणाऱ्या अपेक्षांचा दबाव हा मोठा असतो. मागच्या सामन्यात श्रीलंकेने चांगली गोलंदाजी केली. माझी फलंदाजी तितकी चांगली झाली नाही. असे करिअरमध्ये चढउतार होत असतात.”

हेही वाचा :   T20 World Cup: ‘लाओ भैया दे दो’, सूर्यकुमार यादव सामनावीराच्या पुरस्कारासाठी झाला होता आतुर, पाहा व्हिडिओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शेवटी बोलताना अ‍ॅडम झम्पाला आजच्या सामन्यात खेळणार असल्याचे संकेत त्याने दिले. अ‍ॅडम झम्पा कोरोना झाल्यामुळे तो श्रीलंकेविरुद्धचा सामना खेळू शकला नव्हता. उपांत्य फेरीच्या शर्यतीत मजबूत राहण्यासाठी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोन्ही संघांना हा सामना जिंकणे आवश्यक आहे. कोणताही संघ हा सामना जिंकेल, तो ४ गुणांसह ग्रुप ए मध्ये अव्वल स्थानावर पोहोचेल. पराभूत संघाचे ३ सामन्यांत केवळ दोन गुण होतील. अशा स्थितीत उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडण्याचा धोका त्याच्या डोक्यात घुमू लागेल.