इंग्लंडच्या संघाने टी-२० विश्वचषक स्पर्धेचं जेतेपद पटकावलं आहे. आज मेलबर्नच्या मैदानावर पाकिस्तान विरुद्ध झालेल्या अंतिम सामन्यामध्ये जोस बटलरच्या नेतृत्वाखालील इंग्लंडच्या संघाने अष्टपैलू कामगिरी करत पाच गडी राखून विजय मिळवला. लो स्कोअरिंग सामन्यामध्ये पाकिस्तानच्या भन्नाट गोलंदाजीमुळे अवघ्या १३७ धावांचा पाठलाग करणाऱ्या इंग्लंडला झुंजावं लागलं. मात्र या सामन्यामध्ये पाकिस्तानी गोलंदाजीमधील हुकूमी एक्का असलेल्या शाहीन शाह आफ्रिदीला जखमी झाल्याने मध्येच मैदान सोडून जावं लागलं. असं असलं तरी सामना संपल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीला भारतीय चाहत्यांकडून ट्रोल केलं जात आहे. एकीकडे त्याच्याबद्दल सहानुभूती व्यक्त केली जात असतानाच त्याने केलेल्या एका जुन्या कृतीवरुन ही त्याच्या कर्मची फळं असल्याचंही भारतीय चाहत्यांनी म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नक्की वाचा >> England Win World Cup: ऋषी सुनक असा साजरा करणार पाकिस्तानविरोधातील विजय; भारतीय खेळाडूने पोस्ट केलेला Video Viral

झालं असं की १३ व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर हॅरी ब्रूकने पाकिस्तानचा फिरकीपटू शादाब खानला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र शाहीन शाह आफ्रिदीने ब्रूकचा झेल घेतला. पण हा झेल घेताना शाहीन आफ्रिदीच्या गुडघ्याला दुखापत झाली. यानंतर शाहीन शाह आफ्रिदी त्याचं वैयक्तिक तिसरं षटक टाकण्यासाठी आला मात्र वेदनांमुळे त्याला गोलंदाजी करणे शक्य झाले नाही. परिणामी पहिला चेंडू टाकल्यानंतर आफ्रिदीला मैदानामधून रिटायर हर्ट म्हणून बाहेर पडावे लागले. शाहीन शाह आफ्रिदीच्या षटकातील उरलेले पाच चेंडू मोहम्मद इफ्तिकारने टाकले. याच पाच चेंडूंमध्ये इंग्लंडच्या बेन स्टोक्सने एक चौकार आणि एक षटकार लगावला. याच षटकानंतर सामन्याचं पारडं इंग्लंडच्या बाजूने झुकलं.

नक्की वाचा >> T20 World Cup Final: …म्हणून इंग्लंडच्या संघातील खेळाडू दंडावर काळी पट्टी बांधून पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरले

शाहीन शाह आफ्रिदी होतोय ट्रोल
शाहीन शाह आफ्रिदीला दुखापत झाल्यानंतर आणि त्याच्या उर्वरित षटकामध्ये स्टोक्सने तुफान फलंदाजी केल्यानंतर पाकिस्तानला सामन्यामध्ये पुनरागमन करता आलं नाही आणि पाकिस्तानचा पाच गडी राखून पराभव झाला. या पराभवानंतर पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरने तुटलेल्या हृदयाचा इमोजी पोस्ट करत आपलं दु:ख व्यक्त केलं. त्यावर भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने ‘ही कर्माची फळं आहेत,’ असं ट्वीट केलं.

नक्की वाचा >> “…म्हणून धोनीने जोगिंदर शर्माला शेवटची ओव्हर दिली”; २००७ च्या भारत-पाकिस्तान World Cup Final बद्दल शोएब मलिकचा खुलासा

भारतीयांनीही केलं ट्रोल
भारतीयांनीही शाहीन शाह आफ्रिदीला त्याने यापूर्वी भारतीय संघातील रोहित शर्मा, विराट कोहली आणि के. एल. राहुलची नक्कल केली होती याची आठवण करुन दिली. मागील वर्षी झालेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेमध्ये या तिन्ही फलंदाजींची विकेट घेतल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीने सिमारेषेजवळ या तिघांच्या विकेट्स कशा पडला याची नक्कल प्रेक्षकांना करुन दाखवली होती. अनेकांनी तर शाहीन शाह आफ्रिदीला काहीही दया माया न दाखवता थेट सुनावणाऱ्या शब्दांमध्ये ट्वीट केले आहेत.

नक्की पाहा >> Video: भारतीय गोलंदाजीची पिसं काढणारा अ‍ॅलेक्स हेल्स दुसऱ्याच चेंडूवर क्लिन बोल्ड; आफ्रिदीच्या गोलंदाजीचं होतंय कौतुक

१)

२)

३)

नेमकं कधी बाद केलेलं भारतीय खेळाडूंना
करोनामुळे २०१९ चा विश्वषचक २०२१ साली भरवण्यात आला. या टी-२० विश्वचषकामध्ये २४ ऑक्टोबर २०२१ रोजी झालेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यामध्ये शाहीन शाह आफ्रिदीनेच रोहित, तत्कालीन कर्णधार विराट कोहली आणि के. एल राहुल या तिघांना बाद केलं होतं. शाहीनने ३१ धावा देत तीन बळी घेतले होते. याच कामगिरीच्या जोरावर पाकिस्तानने पहिल्यांदाच विश्वचषक स्पर्धेमध्ये भारताला पराभूत केलं.

नक्की वाचा >> World Cup: भारताच्या पराभवानंतर रात्री सव्वाबाराला गौतम गंभीरची संभ्रमात टाकणारी पोस्ट; म्हणाला, “तुम्ही केवळ…”

पाकिस्तान उपांत्य फेरीत तर भारत बाहेर
पाकिस्तानने भारतावर ऐतिहासिक विजयासह २०२१ मध्ये रूबाबात टी-२० विश्वचषकाच्या अभियानाला प्रारंभ केला होता. त्यानंतर न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानवरही शानदार विजय मिळवले. त्यामुळे ‘अव्वल-१२’ फेरीतून गटविजेते म्हणून ते उपांत्य फेरीत पोहोचले होते. एकीकडे पाकिस्तानने चांगली कामगिरी केली असताना दुसरीकडे भारताला पाकिस्तानबरोबरच न्यूझीलंडकडून मोठा पराभव स्वीकारावा लागल्याने अफगाणिस्तान, स्कॉटलंड आणि नामिबियावर मोठा विजय मिळवूनही भारतीय संघ स्पर्धेबाहेर फेकला गेला. 

नक्की वाचा >> Team India: यापुढे विराट, रोहितला टी-२० संघात स्थान नाही? BCCI च्या सूत्रांची माहिती; म्हणाले, “बीसीसीआयने कधीच…”

नेमकं घडलं काय होतं?
पाकिस्तानने साखळी फेरीमधील त्यांचा शेवटचा सामना स्कॉटलंडविरोधात खेळला. या सामन्याच्या आधीच पाकिस्तानने उपांत्यफेरीमध्ये आपला प्रवेश निश्चित केलेला. स्कॉटलंडविरोधातील सामन्यात समोर दुबळा संघ असल्याने आणि उपांत्यफेरीतील प्रवेश निश्चित झाल्याने खेळाडूंवर ताण नव्हता. यामुळेच शाहीन आफ्रिदीही मजा मस्करीच्या मूडमध्ये होता. तो बॉण्ड्रीजवळ फिल्डींग करत असताना पाकिस्तानी चाहत्यांना शांत बसून राहण्याऐवजी संघाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रवृत्त करत होता. या वेळी चाहत्यांनाही त्याला रोहित शर्मा, के. एल. राहुल आणि विराट कोहली बाद झाल्यानंतरचा प्रतिसाद कसा होता हे अभिनय करुन दाखवण्यास सांगितलं. याचा एका व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

नक्की वाचा >> World Cup: भारताच्या पराभवानंतर पाकिस्तानी पत्रकाराने मर्यादा सोडली; मोदींचा Video शेअर करत म्हणाला, “पंतप्रधानांनी…”

व्हायरल व्हिडीओमध्ये चाहते आधी रोहित शर्माच्या नावाने ओरडू लागतात. त्यानंतर शाहीन लगेच रोहित एलबीडब्ल्यू बाद झाल्यानंतर त्याने कशी रिअॅक्शन दिलेली त्याची नक्कल करुन दाखवतो. त्यानंतर चाहते राहुलच्या नावाने ओरडू लागतात तर शाहीन राहुल बाद झाल्यानंतर त्याने काय केलं हे करुन दाखवतो आणि चाहते एकच कल्ला करु लागतात. शेवटी चाहते विराटच्या नावाने ओरडतात तेव्हा शाहीन विराट कोहली बाद झाल्यानंतर त्याने कशापद्धतीने प्रतिसाद दिलेला याची नक्कल करुन दाखवतो.

नक्की वाचा >> Ind vs Eng: भारताचा दारुण पराभव! स्कोअरकार्ड पोस्ट करत शोएब अख्तर म्हणाला, “बिनबाद १७०… हा आकडा पुढील बराच काळ…”

दरम्यान, इंग्लंडचं ते विश्वचषक स्पर्धेमधलं तिसरं तर टी-२० विश्वचषक स्पर्धेतील दुसरं जेतेपद आहे. इंग्लंडने यापूर्वी एकदा टी-२० चा आणि एकदा एकदिवसीय क्रिकेटमधील विश्वचषक जिंकला होता.

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: World cup final 2022 indian fans call it karma while posting pakistan shaheen afridi mockingly enacts rohit sharma kl rahul virat kohli photos scsg
First published on: 13-11-2022 at 18:49 IST