टी-२० विश्वचषक २०२२ च्या आपल्या पहिल्या सामन्यात भारत आणि पाकिस्तान संघ आमनेसामने आहेत. मेलबर्न क्रिकेट मैदानावर नाणेफेक गमावल्यानंतर पाकिस्तानने, प्रथम फलंदाजी करताना ८ बाद १५९ धावा केल्या. त्यामुळे आता भारतीय संघाला विजयासाठी १६० धावांचे लक्ष्य मिळाले आहे. दरम्यान माजी खेळाडू युवराज सिंगने ट्विट करत, आश्विनने सोडलेल्या झेलबद्धल नाराजी व्यक्त केली.

प्रथम फलंदाजीसाठी उतरलेले पाकिस्तानचे फलंदाज भारतीय गोलंदाजांसमोर गुडघे टेकताना दिसले. पाकिस्तानचा निम्मा संघ १०० धावापूर्वीच डगआऊटमध्ये पोहोचला. मात्र शान मसूदने संघासाठी एकाकी झुंज दिली. मात्र, यादरम्यान मसूदलाही जीवनदानही मिळाले होते. त्याचा फायदा घेत त्याने आपले अर्धशतक झळकावले.

पाकिस्तानच्या डावाच्या आठव्या षटकात मोहम्मद शमीच्या चेंडूवर मसूदला हे जीवनदान मिळाले. तिसऱ्या चेंडूवर मसूदने फाइन लेगच्या दिशेने शॉट खेळला आणि रविचंद्रन अश्विन तिथे होता. मात्र अश्विनला चेंडूचा घेता आला नाही आणि चेंडू त्याच्या समोरच पडला. अश्विनने झेल सोडल्याबद्दल भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने नाराजी व्यक्त केली आहे. अश्विनने सोडलेला झेल ड्रॉप झेल सामन्याची दिशा आणि वेग पाकिस्तानच्या दिशेने वळवू शकतो, असा विश्वास युवीला वाटते.

युवराजने ट्विटरवर लिहिले, “मला वाटते रविचंद्रन अश्विनच्या ड्रॉप झेलने सामन्याचा वेग पाकिस्तानच्या बाजूने वळवला आहे. भारत या सामन्यात पुनरागमन करू शकेल अशी आशा आहे. शाब्बास मुलांनो.”

सामन्याबद्धल बोलायचे, तर भारत-पाक सामन्याची नाणेफेक फेकून रोहित शर्माने प्रथम गोलंदाजी निर्णय घेतला होता. तसेच पाकिस्तान संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी निमंत्रित केले होते. प्रथम फलंदाजी करायला आलेल्या पाकिस्तानची सुरुवात खराब झाली. संघाला पहिला धक्का कर्णधार बाबर आझमच्या रुपाने दुसऱ्या षटकात बसला. त्याला अर्शदीप सिंगने शून्य धावेवर तंबूत पाठवले.

शान मसूदने पाकिस्तानकडून सर्वाधिक धावा केल्या. त्याने ४० चेंडूत ५ चौकांराच्या मदतीने ५२ धावा चोपल्या. तसेच इफ्तिखार अहमदने देखील ५१ धावा केल्या. त्याने ३४ चेंडूचा सामना करताना, ४ षटकार आणि २ चौकाराच्या मदतीने धावा केल्या. त्यामुळे पाकिस्तान संघाला निर्धारित २० षटकांत ८ बाद १५९ धावा करता आल्या.