कसोटी क्रिकेट सामना म्हणजे पाच दिवस हे समीकरण आहे. वर्षानुवर्षे क्रिकेट विश्वात पाच दिवसाचा कसोटी क्रिकेट सामना खेळला जातो आहे. मात्र लवकरच आंतरराष्ट्रीय कसोटी सामने हे चार दिवसांचे करण्याचा विचार ICC करत आहे. प्रत्येक वर्षातील प्रचंड गजबजलेले क्रिकेट दौरे लक्षात घेता ICC कसोटी क्रिकेट सामन्याचे स्वरूप बदलून ते ४ दिवसांचे करण्याचा विचार करत आहे. याबाबत क्रिकेट वर्तुळातून जरी टीकेचा सूर उमटत असला तरीही ICC मात्र आपल्या भुमिकेवर ठाम असल्याचे दिसत आहे.

गांगुलीवर माझा विश्वास, तो ‘असं’ होऊच देणार नाही – शोएब अख्तर

ICC च्या क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी असलेल्या अनिल कुंबळे यांनी चार दिवसाच्या कसोटी सामन्यांच्याबाबत महत्त्वाचे विधान केले आहे. ICC च्या आगामी काळात होणाऱ्या सभेत यावर चर्चा होणार असल्याचे कुंबळे यांनी स्पष्ट केले आहे. ICC ची पुढील सभा २७ ते ३१ मार्च या कालावधीत दुबई येथे होणार आहे. या बैठकीत या मुद्द्यावर चर्चा केली जाणार आहे.

IND vs SL : जेव्हा अख्खं स्टेडियम एकत्र ‘वंदे मातरम’चा जयघोष करतं…

“मी क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी असल्याने मी या मुद्द्यावर आपले मत व्यक्त करू शकत नाही. सध्या हा प्रस्तावावर चर्चेत आलेला नाही. पण येत्या बैठकीत या मुद्द्यावर चर्चा नक्कीच होईल”, अशी माहिती देत ICC आपल्या भुमिकेवर ठाम असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. या समितीमध्ये अँड्र्यू स्ट्रॉस, राहुल द्रविड, महेला जयवर्धने आणि शॉन पोलॅक हे या समितीतील सदस्य आहेत.

रॉस टेलरचा धमाकेदार विक्रम; फ्लेमिंगला टाकलं मागे

ICC चार दिवसाचा कसोटी सामना करण्याचा प्रस्ताव चर्चेला आणणार आहे. सध्या क्रिकेटमधील जुने-जाणते तज्ञ्ज तसेच बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंकेतील माजी फिरकीपटू या कल्पनेच्या विरोधात आहेत. त्यामुळे या प्रकारावर फारसा सकारात्मक प्रतिसाद दिसलेला नाही.

ऑस्ट्रेलियाचा न्यूझीलंडला ‘व्हाईटवॉश’; मार्नस लाबूशेन ठरला ‘हिरो’

कसोटी सामना चार दिवसांचा करण्याच्या नियमाची अंमलबजावणी २०२३ पासून होण्याची शक्यता आहे. २०२३ ते २०३१ या कालावधीत होणाऱ्या कसोटी सामन्यांसाठी हा नियम राबवला जाण्याची शक्यता आहे. पण याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. याबाबत विचारविनिमय सुरु असून तज्ज्ञांकडून मत मागवली जात आहेत.