इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला अखेर शिखर धवनच्या रूपाने धक्का बसला. सलामीवीर शिखर धवन अंगठ्याला झालेल्या दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर गेला. पीटीआय वृत्तसंस्थेने या संदर्भातील वृत्त दिले. तसेच भारतीय संघाचे व्यवस्थापक सुनील सुब्रमण्यम यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला. पण त्याच सामन्यात झालेल्या दुखापतीमुळे शिखर धवनला स्पर्धेतून माघार घ्यावी लागली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Video : काय आहे शिखरची दुखापत –

शिखर धवन अंगठयाच्या दुखापतीमुळे वर्ल्डकपला मुकण्याची शक्यता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यानंतरच व्यक्त करण्यात आली होती. त्याच्या अंगठ्याला झालेल्या दुखापतीमुळे त्याला तीन आठवडे विश्रांतीचा सल्ला देण्यात आला होता. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात धवनने दमदार शतक ठोकले होते, पण दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाच्या डावात तो क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरला नव्हता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याला किमान तीन आठवडे विश्रांतीचा सल्ला देण्यात आल्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे डावखुऱ्या धवनची दुखापत ऋषभ पंतला संघात स्थान देण्यास कारणीभूत ठरले असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.

टीम इंडियाचे व्यवस्थापक सुनील सुब्रमण्यम यांनी दिलेल्या माहितीनुसार धवनच्या डाव्या अंगठ्याला दुखापत झाली असून बोटाला फ्रॅक्चर आहे. जुलैच्या मध्यापर्यंत त्याची दुखापत पूर्णपणे बरी होणे शक्य नाही. त्यामुळे विश्वचषक स्पर्धेतील उर्वरित सामन्यातून त्याला माघार घ्यावी लागली आहे. जायबंदी शिखर धवनच्या जागी ऋषभ पंतला बदली खेळाडू म्हणून अंतिम १५ खेळाडूंच्या संघात स्थान मिळावे अशी विनंती आम्ही केली आहे.

शिखरची तपासणी केल्यानंतर, १०-१२ दिवसात तो बरा होईल, असं संघाचे फिजीओ आणि डॉक्टरांच्या टिमने सांगितलं होतं. यासाठी पर्यायी खेळाडू म्हणून ऋषभ पंतला इंग्लंडला रवाना करण्यात आलं होते. मात्र शिखर धवनच्या दुखापतीमध्ये सुधार होणार नसल्याचे समजताच त्याचे स्पर्धेबाहेर जाणे निश्चीत करण्यात आले. आता शिखर धवनच्या जागी ऋषभ पंतला संघात जागा देण्यात आली आहे.

मराठीतील सर्व क्रिकेट वर्ल्ड कप 2019 बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Icc world cup 2019 team india opener shikhar dhawan out of wc 2019 vjb
First published on: 19-06-2019 at 16:48 IST