भारतीय बॉक्सिंग महासंघावर बंदी घातली असल्यामुळे आपल्यापुढे सध्या कोणतेच ‘लक्ष्य’ नसले तरी आपण बॉक्सिंगचा सराव सुरू ठेवला असल्याचे बीजिंग ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता बॉक्सर विजेंदरसिंग याने सांगितले.
बॉक्सिंग महासंघावरील बंदीमुळे भारतीय खेळाडूंना अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धावर पाणी सोडावे लागले आहे. त्याबाबत खंत व्यक्त करीत विजेंदर म्हणाला, बंदी असली तरी मी कसून सराव करीत आहे. कारण केव्हा बंदी उठविली जाईल हे सांगता येणार नाही. मी केव्हाही व कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी सज्ज आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धामध्ये अव्वल कामगिरी करण्यासाठी मी पुन्हा उत्सुक आहे.

Story img Loader