भारतीय क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या त्याच्या महागड्या जीवनशैलीमुळे नेहमीच चर्चेत असतो. पांड्या आपला छंद पूर्ण करण्यासाठी करोडो रुपये खर्च करण्यास मागेपुढे पाहत नाही. सोशल मीडियावर त्याची कायम चर्चा असते. दरम्यान, त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे, ज्यामध्ये त्याने आपल्या वहिनीला बूट चोरीच्या विधीच्या वेळी मागितल्यापेक्षा पाचपट जास्त पैसे दिले होते. यावरून त्याच्या दिलदारपणाचे प्रचंड कौतुक होत आहे.

व्हायरल झालेला व्हिडिओ हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविकच्या लग्नादरम्यानचा आहे. या दोघांनी यावर्षी १४ फेब्रुवारी रोजी उदयपूरमध्ये मोठ्या थाटात पुनर्विवाह केला. १३ मे २०२० रोजी या जोडप्याने मुंबईत कोर्ट मॅरेज केले होते पण त्यावेळी कोविड-१९ मुळे लग्नाचा भव्य सोहळा होऊ शकला नाही. अशा परिस्थितीत आपणही लग्न थाटामाटात व्हावे, अशी हार्दिकची इच्छा होती. त्यामुळेच दोघांनी पुन्हा लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.

उदयपूरमध्ये तीन दिवस या लग्नाचा जल्लोष सुरू होता

यादरम्यान, त्यांचे दोनदा ख्रिश्चन आणि हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न झाले, ज्यामध्ये सर्व प्रकारचे विधी पार पडले. बूट चोरीच्या कार्यक्रमात हार्दिकची वहिनी पंखुरी शर्मा हिने त्याचे बूट चोरले. पंखुरी शर्मा ही कृणाल पांड्याची पत्नी आहे. जेव्हा बूट परत घेण्याची पाळी आली तेव्हा हार्दिकने त्यांना त्यांच्या मागणीबद्दल विचारले. याला उत्तर म्हणून पंखुरी यांनी एक लाख रुपये मागितले. तेव्हा हार्दिक पंड्या म्हणाला, “मी तुम्हाला फक्त दोन लाख नाह तर तब्बल पाच लाख रुपये ट्रान्सफर करतो.” हे ऐकून तिथे उपस्थित सर्व लोकही खूश झाले होते.

हेही वाचा: Asian Fencing Championships: वर्ल्ड चॅम्पियनला हरवून भवानी देवीने रचला इतिहास, पदक जिंकणारी पहिली भारतीय

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विशेष म्हणजे हार्दिक पंड्या नुकताच आयपीएल २०२३ मध्ये खेळताना दिसला होता. त्याच्या नेतृत्वाखाली त्याने गुजरात टायटन्सला सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत नेले. मात्र, यावेळी शेवटच्या टप्प्यात चेन्नई सुपर किंग्जकडून गुजरातचा पाच गडी राखून पराभव झाला होता. पुढच्या महिन्यात वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर भारत दोन कसोटी, ३ एकदिवसीय आणि पाच टी२० सामन्यांसाठी जाणार आहे. त्यावेळी हार्दिक पांड्या खेळताना पाहायला मिळू शकतो.