भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यानच्या ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना नागपूर येथे खेळला गेला. पाच दिवसांचा कसोटी सामना भारताने तिसऱ्याच दिवशी आपल्याला. या सामन्यात भारताने एक डाव आणि १३२ धावांनी दणदणीत विजय साकारला. भारतीय डावात कर्णधार रोहित शर्मा याने शानदार शतकी खेळी केली होती. आधी शतक व आता विजयानंतर त्याने थेट भारताचा सर्वकालीन महान फलंदाज सचिन तेंडुलकर याचाच मोठा विक्रम मागे सोडला.

नागपूर कसोटीत ऑस्ट्रेलियन संघाने पहिल्या डावात फलंदाजी करताना १७७ धावा केल्या. त्याला प्रत्युत्तर देताना भारताने पहिल्या दिवशी १ बाद ७७ धावा काढल्या होत्या. रोहितने ६९ चेंडूवर नाबाद ५६ धावा पहिल्या दिवशी केलेल्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मात्र त्याने संयम दाखवत १७७ चेंडूंमध्ये शतक पूर्ण केले. यामध्ये १४ चौकार व २ षटकारांचा समावेश होता. बाद होण्यापूर्वी रोहितने आपल्या कारकिर्दीतील नवव्या शतकात १२० धावा केल्या. यामध्ये १५ चौकार व २ षटकारांचा समावेश होता. हे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील ९वे शतक होते.

‘एक तो पूल शॉट बनता है ना भाई’- रोहित शर्मा

मालिकेच्या सुरुवात चांगली होणे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. मी संघासाठी कामगिरी करू शकलो याचा आनंद आहे. दुखापतींमुळे मला काही कसोटींना मुकावे लागले होते, पण मी परत आल्याने आनंदी आहे. शतकी खेळी बद्दल बोलताना तो म्हणाला की, “कालच्या सामन्यात ज्यावेळी मी खेळायला आलो त्यावेळेस आक्रमक फटके मारून फलंदाजी करत होतो. पण मला खेळपट्टी कशी आहे हे खेळताना जसे समजत गेल तसं मी पुढे जात गेलो. यावरून एक मला कळालं की बाद फक्त मी माझ्या चुकीमुळेच होऊ शकतो. म्हणून पॅडला चेंडू लागू नये म्हणून स्वीप आणि पूल शॉट दुसऱ्या दिवसी बंद केले.” यावर इरफान पठाणने स्टार स्पोर्ट्सशी बोलताना रोहितला प्रश्न विचारला की, “ तुझ्या पूल शॉटवरील षटकारावरील काय सांगणार? यावर हिटमॅन म्हणाला की, “ जेव्हा पण मी फलंदाजी करायला येतो तेव्हा एक तर पूल शॉट बनतोच ना.”  

दुखापतीतून कसे सावरायचे यावर त्याने भाष्य केले

माझी कसोटी कर्णधार म्हणून नियुक्ती झाल्यापासून मी फक्त दोन कसोटी सामने खेळलो आहे. इंग्लंडमध्ये कोविड झाला होता, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुखापतीमुळे मुकलो, तर बांगलादेशविरुद्ध अंगठ्याला झालेल्या विचित्र दुखापतीने खेळता आले नाही. गेली काही वर्षे, आम्ही भारतात ज्या प्रकारच्या खेळपट्ट्यावर खेळत आहोत, तुमच्याकडे धावा काढण्यासाठी कौशल्य आणि काही योजना असायला हव्यात. मी मुंबईत फिरकी चालणाऱ्या चेंडू वळणाऱ्या खेळपट्ट्यावर खेळून मोठा झालो आहे. थोडेसे अपरंपरागत व्हा, तुमचे पाय वापरा आणि मग खेळा. आम्हाला माहित आहे की आमच्या फिरकी विभागात गुणवत्ता आहे. पण अशा खेळपट्टीवर सीमर्स धोकादायक ठरू शकतात. जेव्हा पहिल्या डावात २ चेंडूवर शमी आणि सिराजने २ गडी बाद केले ते फारच प्रभावी ठरले.

हेही वाचा: IND vs AUS 1st Test: “हर दिन कोई ना कोई माईलस्टोन के पास…” टीम इंडियाचा कर्णधार होणं सोपं नाही, रोहितचा मजेशीर Video व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारतीय संघाने विजय मिळवल्यानंतर रोहित हा भारताचा सर्वात यशस्वी सलामीवीर बनला आहे. रोहितने सलामीवीर म्हणून शतक झळकावल्यानंतर भारतीय संघाची विजयी होण्याची ही ३१वी वेळ ठरली. यापूर्वी सचिन तेंडुलकर याने सलामीवीर म्हणून झकावलेल्या शतकांतील ३० सामने जिंकले होते. या यादीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग आहे. त्याने झळकावलेल्या शतकांपैकी २१ शतकांवेळी भारताला विजय संपादन करण्यात यश आलेले.