बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये पराभव मिळाल्यानंतर तिसऱ्या कसोटी मात्र ऑस्ट्रेलियाने जोरदार पलटवार केला. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील हा तिसरा कसोटी सामना इंदोरच्या होळकर स्टेडियमवर खेळला गेला. उभय संघांतील हा सामना ऑस्ट्रेलियाने ९ विकेट्स राखून जिंकला. सामना जिंकल्यानंतर कर्णधार स्टीव्ह स्मिथ याने खेळाडूंचे कौतुक केले. तसेच नियमित कर्णधार पॅट कमिन्सच्या अनुपस्थितीवर देखील बोलला.

ऑस्ट्रेलियाने भारताचा दुसरा डाव १६३ धावांवर गुंडाळला आणि त्यांना विजयासाठी ७६ धावा करायच्या आहेत. पण, हा धावा करणं एवढं सोपं नक्की नव्हतं, याची कल्पनाही त्यांना होतीच. आर अश्विनने नव्या चेंडूसह दुसऱ्याच चेंडूवर उस्मान ख्वाजाची विकेट घेऊन त्याची प्रचिती दिली. स्टेडियममधील प्रेक्षक भारतीय गोलंदाजांचा मनोबल वाढण्यासाठी करत असलेला जल्लोष पाहून ऑसी फलंदाज बॅकफूटवर गेले. यावर उतारा म्हणून मार्नस लाबुशेनने माईंड गेम सुरू केला आणि त्याला समजावण्यासाठी रोहित शर्मा व अंपायर यावे लागले.

इंदोरच्या होळकर स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या कसोटी सामन्यातील खेळपट्टी फिरकी गोलंदाजांसाठी अनुकूल असल्याचे पाहायला मिळाले. भारतीय फलंदाजांनी याठिकाणी झटपट विकेट्स गमावल्यामुळे पराभवाचे तोंड पाहावे लागले. सामना जिंकल्यानंतर स्टीव्ह स्मिथ माध्यमांशी बोलत होता. यावेळी तो म्हणाला, “मला वाटते पहिल्या दिवशी नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम गोलंदाजी करावी लागली, पण आमच्या गोलंदाजांनी खरोखर चांगले प्रदर्शन केले. विशेषकरून मॅथ्यू कुहनेमन याने. पहिल्या डावात उस्मान ख्वाजाने फलंदाजीत चांगले योगदान दिले आणि काही महत्वाच्या भागीदारीही झाल्या. शेवटच्या षटकांमध्ये भारताने खोरखर जबरदस्त गोलंदाजी केली, ज्यामुळे संघ डगमगला. पुजाराने चांगली खेळी केली, नॅथन लायन यानेही चांगले गोलंदाजी करत ८ विकेट्स घेतल्या.”

मला भारतात संघाचे नेतृत्व करायला आवडते

ऑस्ट्रेलियाचा नियमित कसोटी कर्णधार पॅट कमिन्स बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात संघाचे नेतृत्व करताना दिसला. पण पहिल्या दोन सामन्यांतील पराभवानंतर कमिन्सने वैयक्तिक कारणास्तव मायदेशात परतण्याचा निर्णय घेतला. अशात तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी स्मिथला कर्णधारपदाची जबाबदारी सोपण्यात आली. स्मिथच्या नेतृत्वात भारतात ऑस्ट्रेलियन संघाचा हा दुसरा कसोटी विजय आहे. संघाचे नेतृत्व करायला मिळाले याविषयी देखील स्मिथ माध्यामांसमोर बोलला.

हेही वाचा: IND vs AUS: “सारखे काय पिचवर बोलता, बोलण्यासारखे…”, सामन्यानंतर टीकाकारांना रोहित शर्माने फटकारले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“आम्ही पॅटविषयी विचार करत आहोत, जो मायदेशात परतला आहे. आमच्या भावना त्याच्यासोबत आहेत. मी खरंच कर्णधारपदाचा आनंद घेतला. जगातील या भागात (भारतात) नेतृत्व करणे मला आवडते. कारण याठिकाणी परिस्थिती मला खरंच चांगल्या प्रकारे समजते. जगातील इतर भागांपेक्षा हे ठिकाण वेगळे आहे. मी या आठवड्यात खूप चांगले काम केले आहे,” असे स्मिथ पुढे म्हणाला. दरम्यान कमिन्स त्याच्या आईची तब्येत बिघडल्यामुळे मायदेशात परतल्याचे बोलले जात आहे.