ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु असलेल्या टी-२० मालिकेच्या दुसऱ्या सामन्यामध्ये नागपूरच्या मैदानात कर्णधार रोहित शर्माने केलेल्या २० चेंडूंत नाबाद ४६ धावांच्या आक्रमक खेळीच्या बळावर भारताने सहा गडी राखून विजय मिळवला. या विजयामुळे आता तीन सामन्यांची मालिका १-१ च्या बरोबरीत आहे. भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. मात्र या सामन्यानंतर रोहित शर्माचं जितकं कौतुक होत आहे तितकचं कौतुक प्रशिक्षक राहुल द्रविडचंही होत आहे. द्रविडची सासरवाडी असणाऱ्या नागपूरमधील सामन्यानंतर त्याने केलेली कृती सध्या कौतुकाचा विषय ठरत आहे.

नक्की पाहा >> Yorker King मैदानात परतला! बुमराहचा यॉर्कर फिंचला कळालाच नाही; बाद झाल्यानंतर असं काही केलं की… पाहा Video

झालं असं की, मालिकेमधील दुसरा नियोजित सामना नागपूरमध्ये खेळवण्यात आला. नियोजित वेळेनुसार हा सामना सायंकाळी सात वाजता सुरु होणार होता. मात्र पाऊस आणि त्यानंतर मैदानातील काही भाग ओला असल्याने सामना सुरू होण्यासाठी विलंब झाला. सामन्यातील पहिला एक ते दीड तास वाया गेला. अखेर दोन्ही संघांच्या कर्णधारांशी चर्चा करुन हा सामना आठ-आठ षटकांचा करण्यात आला. हजारो क्रिकेट चाहते हा सामना पाहण्यासाठी नागपूरच्या मैदानात जमले होते. या निर्णयामुळे त्यांचा हिरमोड झाला नाही. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करताना आठ षटकांमध्ये ५ बाद ९० अशी धावसंख्या उभारली.

रोहित शर्माने केलेल्या दमदार खेळीमुळे भारताने चार चेंडू आणि सहा गाडी राखून हा सामना जिंकला. दिनेश कार्तिकने शेवटच्या षटकामध्ये दहा धावा हव्या असतानाच एक षटकार आणि एका चौकाऱ्याच्या मदतीने विजयाचा कळस चढवला. या सामन्यानंतर भारतीय खेळाडू जल्लोष करत असतानाच राहुल द्रविड मात्र कमी षटकाचा का असेना पण हा सामना खेळवण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या मैदानावरील कर्मचाऱ्यांच्या म्हणजेच ग्राऊण्ड्स मनच्या भेटीसाठी गेला.

नक्की वाचा >> Ind vs Aus: खणखणीत… ‘या’ षटकारासहीत रोहित शर्माची अनोख्या विश्वविक्रमाला गवसणी; तुम्ही पाहिलात का हा Video

द्रविडने नागपूरच्या मैदानावर ग्राऊण्ड मन म्हणून काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीशी हस्तांदोलन केलं. हसत मुखाने त्यांना धन्यवाद म्हटलं. त्यांच्यासोबत काही वेळ चर्चाही केली. द्रविडचा हा वेगळेपणा चाहत्यांनाही चांगलाच भावल्याचं सोशल मीडियावर दिसून आलं. अनेकांनी द्रविडची ही कृती कौतुकास्पद असल्याचं म्हटलं. म्हणून द्रविड हा इतरांपेक्षा वेगळा असल्याचंही काहींनी म्हटलं. पाहूयात काही व्हायरल ट्वीट…

१)

२)

३)

४)

५)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रोहित शर्मानेही सामन्यानंतर मैदानावरील कर्मचाऱ्यांच्या कामाचं कौतुक केलं. हे लोक दुपारी दीड वाजल्यापासून अगदी सामनासंपेपर्यंत मैदानावर होते असं सांगत रोहितने या कर्मचाऱ्यांचे आभार मानले. त्यांच्यामुळेच क्रिकेट चाहत्यांचा हिरमोड झाला नाही आणि छोटा का असेना सामना खेळता आला अशा भावना रोहितने व्यक्त केल्या. तर या सामन्यामधील फिनिशर म्हणून चर्चेत आलेल्या दिनेश कार्तिकनेही बऱ्याच कालावधीनंतर मैदानामध्ये असं वातावरण पाहिल्याचं समाधान वाटलं अशी प्रतिक्रिया सामन्यानंतर दिली.