scorecardresearch

IND vs AUS: कांगारु टीममध्ये आश्विनच्या फिरकीची भलतीच दहशत; प्रमुख फलंदाज म्हणाला, ‘आश्विन म्हणजे तोफ…’

Usman Khawaja on R Ashwin: अश्विन ही तोफ असल्याचे ख्वाजा म्हणाला. तो खूप कुशल आहे आणि त्याच्याकडे विविधता आहे. जी तो खूप चांगल्या प्रकारे वापरतो. त्याचा सामना करणे आव्हानात्मक असेल. तिसऱ्या-चौथ्या दिवशी विकेट वळेल आणि तो जास्त षटके टाकेल.

IND vs AUS Test Series Usman Khawaja praised R Ashwin's bowling and said he is a cannon
आर.आश्विन (फोटो-संग्रहित छायाचित्र इंडियन एक्सप्रेस)

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात ९ फेब्रुवारीपासून ४ सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना नागपुरात खेळला जणारा आहे. या मालिकेत नेतृत्वाची धुरा रोहित शर्मा आणि पॅट कमिन्सच्या खांद्यावर असणार आहे. या मालिकेपूर्वी उस्मान ख्वाजाने आर आश्विनबद्दल एक महत्वाचे वक्तव्य केले आहे.

ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर उस्मान ख्वाजा, जो गेल्या काही वर्षांमध्ये खूप यशस्वी ठरला आहे. तो म्हणाला की, रविचंद्रन अश्विनच्या नेतृत्वाखालील भारतीय फिरकी आक्रमण हे चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत सर्वात कठीण आव्हान असेल. व्हिसा मिळण्यास उशीर झाल्याने पाकिस्तानात जन्मलेला ख्वाजा संघानंतर येथे दाखल झाला. तो डेव्हिड वॉर्नरसोबत डावाची सुरुवात करेल.

उस्मान ख्वाजा सिडनी मॉर्निंग हेराल्डशी बोलताना म्हणाला, ”ही एक वेगळीच अनुभूती आहे. या खेळात कोणतीही हमी नाही पण फलंदाजी आणि गोलंदाजीत अधिक परिपक्वता आली आहे. गेल्या दहा वर्षांत आम्ही खूप काही शिकलो आहे. विशेषत: तुम्हाला कोणत्या प्रकारचे विकेट्स मिळतील. मला वाटते की आता आम्ही येथे कसोटी जिंकू शकतो. आता आम्ही पूर्वीपेक्षा चांगल्या स्थितीत आहोत, पण मालिका खूप खडतर असेल.”

हेही वाचा – IND vs AUS: ‘अ‍ॅशेसपेक्षा मोठा विजय…’, आस्ट्रेलियन खेळाडूंनी सांगितले की भारतात मालिका जिंकणे किती महत्त्वाचे; पाहा VIDEO

ऑस्ट्रेलियाने कसोटी मालिकेपूर्वी सराव सामना न खेळण्याचा निर्णय घेतला. त्याऐवजी बंगळुरूजवळील फिरकीपटूंना अनुकूल खेळपट्ट्यांवर सराव करणे चांगले. ते अश्विनला सर्वात मोठा धोका मानतात आणि त्याला सामोरे जाण्यासाठी ‘डुप्लिकेट’ची मदत घेत आहेत.

हेही वाचा – IND vs AUS: जडेजाविरुद्ध काय करावे आणि काय करू नये? याबद्दल शेन वॉटसनने आपल्या फलंदाजांना दिला महत्वाचा सल्ला

ख्वाजा पुढे म्हणाला, “अश्विन एक तोफ आहे. तो खूप कुशल आहे आणि त्याच्याकडे विविधता आहे. जी तो खूप चांगल्या प्रकारे वापरतो. त्याचा सामना करणे आव्हानात्मक असेल. तिसऱ्या-चौथ्या दिवशी विकेट वळेल आणि तो अधिक षटके टाकेल. त्याच्यासमोर मी धावा कशा करू शकतो हे पाहावे लागेल. विकेट चांगली असेल तर नवीन चेंडू खेळणे सर्वात सोपे असते. पण विकेट तुटली तर फिरकीपटू नवीन चेंडू हाताळत असतील तर भारतात फलंदाजी करणे सर्वात कठीण होते.”

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-02-2023 at 15:20 IST
ताज्या बातम्या