भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या वन-डे सामन्यात शतक झळकावत संघाला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली. विराटने 120 चेंडूत 116 धावांची खेळी केली. या खेळीत 10 चौकारांचा समावेश होता. विजय शंकरने झळकावलेल्या 46 धावांचा अपवाद वगळता एकही फलंदाज विराटची साथ देऊ शकला नाही. एका बाजूने सर्व फलंदाज माघारी परतत असताना विराटने खेळपट्टीवर पाय रोवून उभं राहत शतक झळकावलं. महत्वाची गोष्ट म्हणजे विराट कोहलीचं 18 डावांनंतर घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्धचं पहिलं शतक ठरलं आहे. 2013 साली नागपूरच्याच मैदानावर खेळत असताना कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक झळकावलं होतं.

2019 विश्वचषकाआधी भारतीय संघाची ही अखेरची आंतरराष्ट्रीय वन-डे मालिका असणार आहे. त्यामुळे या मालिकेत विराट कोहलीने आपला फॉर्म टिकवून ठेवणं ही भारतीय संघासाठी आश्वासक बाब मानली जात आहे.

अवश्य वाचा – IND vs AUS : रिकी पाँटींगला मागे टाकत भारतीय कर्णधाराची ‘विराट’ कामगिरी