भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना मेलबर्न येथे खेळण्यात येणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघाने कसून सराव केला आहे तसेच संघात काही बदलदेखील केले आहेत. या वर्षात सर्वोत्तम खेळ करणारा विराट कोहली चांगल्या लयीत असून संघाचे नेतृत्व समर्थपणे करत आहे. त्यामुळे विराट हा ग्रहावरील सर्वोत्तम क्रिकेटपटू असल्याचे मत दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न याने व्यक्त केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘लहानपणी आपण आपल्या पिढीतील सर्वोत्तम खेळाडू व्हावे असे अनेकांना वाटत असते. पण तसं करणं प्रत्येकालाच जमेल असं नाही. विराटने मात्र ते जमवलं आहे. तो अत्यंत वादळी खेळी करू शकतो. मैदानात तो खूप उत्साही असतो. भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका सध्या १-१ अशी बरोबरीत असताना विराटचे बॉक्सिंग डे कसोटीमध्ये खेळणे हा एक दुग्धशर्करा योग आहे. कारण विराट हा पृथ्वीतलावरील सर्वोत्तम क्रिकेटपटू आहे’, असे वॉर्न म्हणाला.

बॉक्सिंग डे कसोटी हा एक महत्वाचा सामना असतो. दरवर्षी हा सामना अधिकच रंगतदार होतो. यंदा कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत आहे. अशा वेळी भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन तुल्यबळ संघ एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत, ही रोमांचक गोष्ट आहेच. पण वर्षभरात उत्तम कामगिरी करणारा विराट कोहली हा या सामन्यात खेळणार असल्याने या सामन्याची उत्कंठा आहे, असेही वॉर्नने सांगितले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs aus virat kohli is greatest cricketer on the planet says shane warne
First published on: 25-12-2018 at 16:56 IST