भारत आणि बांगलादेश संघातील पहिल्या कसोटी सामन्याचा आज तिसरा दिवस आहे. बांगलादेशने पहिल्या डावात दुसऱ्या दिवसाच्या समाप्तीपर्यंत ४४ षटकांत ८ बाद १३३ धावा केल्या होत्या. त्यानंतर पुढे खेळताना तिसऱ्या दिवशी बांगलादेशचा पहिला डाव १५० धावांवर आटोपला. ज्यामुळे आता भारतीय संघाकडे पहिल्या डावात्या जोरावर २५४ धावांची आघाडी आहे.

तिसऱ्या दिवशी खेळायला सुरुवात केल्यावर बांगलादेश संघाला नववा धक्का इबादोत हुसेनच्या रुपान बाद झाला. त्याने संघासाठी १७ धावांचे योगदान दिले. त्याला बाद करताच कुलदीप यादवने आपल्या विकेट्सचे पंचक पूर्ण केले. त्यानंतर मेहदी हसन २५ धावांवर बाद झाला. त्याला अक्षर पटलने बाद केले. अशा प्रकारे बांगलादेशचा पहिला डाव ५५.५ षटकांत १५० धावांवर आटोपला.

बांगलादेश संघाला पहिला धक्का नजमुल हुसेन शांतोच्या रुपाने बसला. तो संघाचे आणि स्वत:चे खात्य उघडण्या अगोदर बाद झाला. त्याच्या पाठोपाठ यासिर अली देखील ४ धावा काढून बाद झाला. त्यामुळे बांगलादेश संघ अडचणीत आला. त्यानंतर २४.२ षटकात बांगलादेशचा निम्मा संघ तंबूत परतला होता. तेव्हा संघाची धावसंख्या ७५ अशी होती. दरम्यान यानंतर ही संघाची पडझड सुरु राहिल्याने संघ दबावात सापडला.

बांगलादेशकडून फलंदाजी करताना मुशफिकर रहीमने सर्वाधिक धावा केल्या. त्याने ५८ चेंडूत ३ चौकारांच्या मदतीने २८ धावा केल्या. त्याचबरोबर लिटन दास (२४) आणि झाकिर हसनने (२०) थोड्या प्रमाणात धावा केल्या. मात्र इतर चार फलंदाजांना दोन आकडी धावसंख्या सुद्धा पार करता आली नाही. त्यामुळे बांगलादेशने ४४ षटकाच्या समाप्तीनंतर ८ बाद १३३ धावा केल्या होत्य. त्याचबरोबर भारताच्या तुलनेत २७१ धावांनी मागे होते.

हेही वाचा – IND vs BAN 1st Test: कुलदीपच्या कामगिरीने प्रभावित झाले प्रशिक्षक पांडे; म्हणाले, ‘तो एक योद्धा आहे, ज्याची विकेटची…’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा मेहदी हसन १६ आणि इबादोत हुसेन १३ धावांवर नाबाद होते. भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना, फिरकीपटू कुलदीप यादवने सर्वादिक विकेट्स घेतल्या. त्याने ४ विकेट्स घेतल्या होत्या. त्याचबरोबर मोहम्मद सिराजने दुसऱ्या बाजूने वेगवान मारा सुरुच ठेवताना ३ विकेट्स घेतल्या होत्या. तसेच उमेश यादवने १ विकेट घेतली होती.