बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत भारताला पराभवाचा सामना करावा लागला. या विजयासह बांगलादेशने तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. या सामन्यात भारताचा पराभव झाला असला, तरी रोहित शर्माच्या झंझावाती खेळीने सर्वांचे मन जिंकले. त्याच्या या खेळीचे सूर्यकुमार यादव आणि पत्नी रितिका सजदेह अनेकांनी कौतुक केले आहे.

आता भारत आणि बांगलादेश संघांमधील तिसरा वनडे शनिवारी चट्टोग्राम येथे खेळवला जाणार आहे. बुधवारी प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने ५० षटकांत ७ गडी गमावून २७१ धावा केल्या.प्रत्युत्तरात भारतीय संघाने एकवेळ ४३व्या षटकात २०७ धावांत सात विकेट गमावल्या होत्या. यानंतर मैदानावर रोहित शर्माची झंझावाती खेळी पाहायला मिळाली. सूर्यकुमार यादव आणि पत्नी रितिका सजदेहसह चाहत्यांनी सोशल मीडियावर रोहितच्या या धाडसी खेळीचे कौतुक केले आहे.

रोहितने एकहाती खेळी करत भारताला विजयाच्या उंबरठ्यावर नेले, पण शेवटच्या चेंडूवर सहा धावा भारतासाठी खूप जास्त ठरल्या. नवव्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या रोहितने २८ चेंडूत नाबाद ५१ धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत तीन चौकार आणि पाच षटकार मारले. खरंतर, रोहितला सामन्याच्या सुरुवातीला दुखापत झाली होती. त्यांच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली. त्याच्या बोटातूनही रक्त येत होते. यानंतर त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

हेही वाचा – IND vs BAN: “जर फलंदाजीला यायचंच होतं तर…” कर्णधार रोहित शर्मावर सुनील गावसकर भडकले

टीम इंडिया आणि आयपीएल फ्रँचायझीमधील रोहितचा जोडीदार सूर्यकुमार यादव यांनी ट्विट केले, ”रोहित शर्मा तुझ्याबद्दल खूप आदर भावा.” त्याच वेळी, रितिकाने रोहितसाठी एका इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले, ”मी तुझ्यावर प्रेम करते आणि तू ज्या प्रकारचा व्यक्ती आहेस त्याचा मला अभिमान आहे. अशा परिस्थितीत मैदानात उतरून शानदार खेळी करणे अभिमानास्पद आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.