गोलंदाजांनी केलेल्या धडाकेबाज कामगिरीच्या जोरावर भारताने कोलकाता कसोटी सामन्यावर आपलं वर्चस्व निर्माण केलं आहे. इशांत शर्मा, उमेश यादव आणि मोहम्मद शमीच्या भेदक माऱ्यापुढे बांगलादेशचा पहिला डाव १०६ धावांवर आटोपला. भारतीय संघाचा हा पहिलाच आंतरराष्ट्रीय दिवस-रात्र कसोटी सामना होता. इशांत शर्माने या सामन्यात आपल्या नावावर अनोख्या विक्रमाची नोंद केली आहे.

भारताकडून दिवस-रात्र वन-डे सामन्यात पहिल्यांदा पाच बळी घेण्याचा मान अनिल कुंबळेच्या नावावर आहे. टी-२० क्रिकेटमध्ये ही कामगिरी कुलदीप यादवने करुन दाखवली आहे. यानंतर दिवस-रात्र कसोटी सामन्यात इशांतने अशी कामगिरी करुन दाखवली आहे.

इशांतने शर्माने सामन्यात ५, उमेश यादवने ३ तर मोहम्मद शमीने २ बळी घेतले.

अवश्य वाचा – IND vs BAN : मायदेशात खेळताना इशांतला सूर सापडला, निम्मा संघ केला गारद