बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाने शानदार विजय मिळवला. या मालिकेत टीम इंडियाने बांगलादेशचा २-० असे निर्भेळ यश संपादन केले. मात्र, या मालिकेत भारतीय चाहत्यांना विराट कोहलीचा खराब फॉर्म पाहायला मिळाला. विराट कोहलीला कसोटी मालिकेत एकाही डावात ३० धावांचा आकडा पार करता आला नाही. प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनी विराट कोहलीला लहानपणी दिलेल्या सल्ल्याचा खुलासा केला आहे.

भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली याने २०२२मध्ये दमदार पुनरागमन केले. त्याचा फॉर्म एकदिवसीय आणि आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये परतला आहे. मात्र, कसोटी क्रिकेटमध्ये अजूनही विराट संघर्ष करताना दिसत आहे. बांगलादेशविरुद्ध झालेल्या दोन कसोटी सामन्यात विराटला विशेष कामगिरी करता आली नाही. त्याने आपली विकेट स्वस्तात फेकली. दोन्ही सामन्यात विराट फिरकीविरुद्ध टिकू शकला नाही. कसोटीत सातत्याने अपयशी होत असलेल्या विराट कोहलीचे बालपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनी त्याच्या फलंदाजीवर नाराजी व्यक्त केली आहे.

ms dhoni thala joined hands being thankful to fan in ekana cricket stadium lsg vs csk ipl 2024 live match
थालाच्या भरमैदानातील ‘त्या’ कृतीने जिंकली चाहत्यांची मने; VIDEO पाहून म्हणाले, “वॉव…”
MS Dhoni Only Given Limited Batting In CSK Trainer Explains Why
MS धोनीला शेवटच्याच षटकांमध्ये फलंदाजी देण्याचं कारण अखेरीस आलं समोर; प्रशिक्षक म्हणाले, “त्याचे शॉट्स..”
Viral wedding photoshoot of bride working out in a park in Traditional wedding lehenga netizen say her Tiger Shroff female version
“लेडी टायगर श्रॉफ!”, चक्क लग्नाच्या लेहेंग्यात नवरी करतेय व्यायाम, हटके फोटोशूट पाहून चक्रावले नेटकरी; Video एकदा बघाच
IPL, GT vs PBKS Preity Zinta Post For Shashank Singh
“IPL लिलावाच्या वेळी झालेल्या चुकीच्या..”, शशांक सिंगबाबत वादावर प्रीती झिंटाने सोडलं मौन, म्हणाली, “आजचाच..”

इंडिया न्यूज स्पोर्ट्सवरील चर्चेत राजकुमार शर्मा म्हणाले, “जेव्हा विराट कोहली भारतीय संघात नवीन होता. मग तो मला येऊन माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक काय सांगत असे ह्याबद्दल प्रश्न विचारायचा. मी त्याला म्हणायचो की ते सर्व तुमचे हितचिंतक आहेत आणि तुम्हाला चांगले काम करताना त्यांना पाहायचे आहे. मी त्याला नेहमी सांगितले की एखाद्याच्या मताचा आदर केला पाहिजे. यासोबतच हेही लक्षात ठेवले पाहिजे की तो जे काही बोलतो ते तुमच्या खेळाच्या बाजूने असेलच असे नाही, ते तुमच्या व्यक्तिमत्वाच्या बाबतीत देखील असू शकते.”

हेही वाचा: IND vs BAN: “बॅट घुमावो, ट्रॉफी की थोडी पप्पी लो…!” मोहम्मद कैफने पुजाराची खेचली, Video व्हायरल

बालपणीचे प्रशिक्षकांनी पुढे म्हटले की, “विराट स्वीपसारखे रचनात्मक फटक्यांचा वापर करून मोकळेपणाने खेळू शकला असता.” ते म्हणाले, “एक फलंदाज बाद झाल्यानंतर खूपच निराश होतो. विराट कोहली स्वभावाने खूपच आक्रमक आहे. मात्र, ज्याप्रकारे तो बाद होत आहे, ते अस्वीकार्य आहे. बांगलादेशच्या फिरकीपटूंविरुद्ध त्याच्या बरोबरीच्या फलंदाजांना संघर्ष करताना पाहणे दुर्दैवी आहे. त्याने आपला इरादा स्पष्ट करायला पाहिजे होता.”

कोहलीच्या बाद होण्याच्या पद्धतीवर प्रतिक्रिया देताना राजकुमार पुढे म्हणाले की, “यार्डाच्या आत मिड-ऑन आणि मिड-ऑफ दोन्ही क्षेत्ररक्षकांसोबत, तो आणखी मोकळेपणाने खेळू शकला असता. जोपर्यंत तुम्ही कोणत्याही फिरकीपटूला त्रास देत नाहीत, तो तुम्हाला खेळू देणार नाही. तुम्हाला नवीन काहीतरी करण्याची गरज आहे. जसे की, स्लॉग स्वीप खेळणे किंवा बाहेर जाणाऱ्या चेंडूला स्वीप करणे.”

हेही वाचा: टीम इंडियामध्ये हार्दिक ‘राज’… STAR SPORTS ने प्रोमोमध्ये पांड्याला कर्णधार म्हणून दाखवले… नंतर Video का डिलीट केला?

खराब फॉर्मशी झुंजत असलेला विराट

बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने १८८ धावांनी मोठा विजय नोंदवला. पण सामन्याच्या दोन्ही डावात विराटला जास्त धावा करता आल्या नाहीत. विराट कोहलीला पहिल्या डावात केवळ १ धाव करता आली. त्याला तैजुल इस्लामने बाद केले. दुसऱ्या डावात कोहली १९ धावा करून नाबाद राहिला. दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावातही तो अवघ्या २४ धावा करून बाद झाला. दुसऱ्या डावात पुन्हा एकदा तो १ धावा काढून बाद झाला.