बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीतील पहिल्या डावात अष्टपैलू खेळाडू कुलदीप यादवने चमकदार केली. या कामगिरीने त्याचे प्रशिक्षक कपिल पांडे यांनी गुरुवारी सांगितले की, त्यांचा शिष्य हा एक योद्धा आहे. जो संधी मिळाल्यावर देशासाठी सर्वोत्तम कामगिरी करण्यास उत्सुक असतो. कुलदीपने बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या डावात ४० धावांचे योगदान देत संघाची धावसंख्या ४०० च्या जवळ नेली. त्याचबरोबर त्याने आतापर्यंत आपल्या धारदार गोलंदाजीने चार महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या आहेत.

कुलदीपचे प्रशिक्षक कपिल पांडे यांनी युनिवार्ताला सांगितले की, “कुलदीप हा फायटर आहे. तो असा गोलंदाज आहे, ज्याची विकेट्सची भूक कधीच संपणार नाही. जवळपास १८ महिने भारतीय संघापासून दूर असलेल्या या गोलंदाजाने आज दाखवून दिले की, जेव्हाही संधी मिळेल तेव्हा तो विकेट घेतो. कसोटी सामन्यात त्याची सरासरी सर्वाधिक चार विकेट्सची आहे. त्याच्या गोलंदाजीत अजूनही बरीच धार आहे.”

IPL 2024 Lucknow Super Giants vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024: धोनीचा अद्भुत षटकार! संपूर्ण कारकिर्दीत माहीने पहिल्यांदाच लगावला भन्नाट शॉट; एबी-सूर्यालाही विसराल
IPL 2024 Punjab Kings vs Mumbai Indians Match Updates in Marathi
IPL 2024: आशुतोष शर्माची आयपीएलमध्ये ऐतिहासिक कामगिरी, १७ वर्षांच्या इतिहासात ही कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू
Rohit first Indian to hit 500 sixes
MI vs CSK : रोहित शर्माने रचला इतिहास! टी-२० क्रिकेटमध्ये आतापर्यंत कोणत्याच भारतीय खेळाडूला जमलं नाही ते करून दाखवलं
Rr Vs Gt Ipl 2024 Sanju Samson 50th Match As Captain
RR vs GT : संजू सॅमसनने ५०व्या सामन्यात केला खास पराक्रम, ‘या’ बाबतीत रोहित शर्मासह तीन कर्णधारांना टाकले मागे

कुलदीपने भारतासाठी फक्त आठ कसोटी सामने खेळले असतील, पण त्याने आतापर्यंत १३ डावांत ३० बळी घेतले आहेत. यासोबतच त्याने दोन वेळा पाच विकेट्सही घेतल्या आहेत. कपिल म्हणाले, “ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी (२०१९) येथे एका डावात पाच विकेट घेतल्यानंतरही कुलदीपला संघात संधी मिळाली नाही, तर त्याआधी इंग्लंडविरुद्धही त्याची कामगिरी उत्कृष्ट होती.”

कपिल यांनी सांगितले की, भारतीय संघापासून दूर असताना कुलदीपने सरावात कोणतीही कमतरता पडू दिली नाही. कपिल म्हणाले, “आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा भाग नसल्यामुळे कुलदीप थोडा निराश झाला होता, पण मी त्याला सकारात्मक मानसिकतेने सतत सराव करण्याचा सल्ला दिला. याचा परिणाम असा झाला की कुलदीपने दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना कोलकाताविरुद्ध शानदार कामगिरी केली. त्यामुळे कोलकाताला दिल्लीकडून दोन्ही सामने गमावले.”

ते पुढे म्हणाले, “कुलदीपने आयपीएलमध्ये २१ विकेट घेतल्या, मात्र त्यानंतरही तो २०२२ च्या टी-२० विश्वचषकासाठी संघात स्थान मिळवू शकला नाही. याकडे दुर्लक्ष करून, तो कसोटी क्रिकेट मनात ठेवून स्थानिक स्तरावर लीग सामने आणि देशांतर्गत स्पर्धांमध्ये खेळला. स्वतःला व्यस्त ठेवले. सरावातील सातत्य आज पुन्हा त्याच्या फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये दिसून येत आहे. ज्यामुळे संघ व्यवस्थापन तसेच लाखो क्रीडाप्रेमींना आनंद झाला आहे. खेळाडूला याचीच गरज आहे.”

हेही वाचा – Manoj Prabhakar Steps Down: मनोज प्रभाकर नेपाळ क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदावरुन पायउतार; बोर्डाने दिली माहिती

कपिल म्हणाला, “कुलदीप बॅटने कधीच कमकुवत राहिला नाही. कुलदीप २०१४-१५मध्ये उत्तर प्रदेशचा सर्वोत्तम फलंदाज ठरला आहे. जेव्हा त्याने प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ४१५ धावा केल्या होत्या. कसोटीत तुम्हाला फलंदाजीची संधी मिळते, तर एकदिवसीय आणि टी-२० मध्ये तुमच्याकडे वेळ आणि षटके कमी असतात. त्याची फलंदाजी चांगली आहे, त्याला फक्त संधी मिळणे आवश्यक आहे. जर तो आज चांगली कामगिरी करत आहे, तर ते त्याच्या मेहनतीमुळे आहे.”

हेही वाचा – BAN v IND 2022: भारताला एका चेंडूवर चौकार न लावता मिळाल्या सात धावा, बांगलादेशच्या खेळाडूने केली मोठी चूक

सामन्याबद्दल बोलायचे तर, सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर बांगलादेशने आठ गडी गमावून १३३ धावा केल्या आहेत. या अगोदर भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ४०४ धावा केल्या होत्या. त्या तुनेत बांगलादेश अजूनही २७१ धावांनी मागे आहे.