एकदिवसीय मालिकेनंतर भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध २ सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. ही मालिका १४ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. भारतीय संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी दुखापतीमुळे या मालिकेतून बाहेर पडला आहे. एका वृत्तानुसार, विजय हजारे ट्रॉफीमध्ये नुकताच सौराष्ट्रला चॅम्पियन बनवणारा खेळाडू जयदेव उनाडकटचा त्याच्या जागी समावेश करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

क्रिकबझमधील एका वृत्तानुसार, बीसीसीआयच्या एका सूत्राने त्यांना सांगितले आहे की जयदेव उनाडकटची मोहम्मद शमीच्या जागी पसंत नसून त्याच्या सध्याच्या फॉर्मच्या आधारावर निवड करण्यात आली आहे. नुकत्याच पार पडलेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये उनाडकटने सर्वाधिक १९ विकेट्स घेतल्या होत्या.

३१ वर्षीय डावखुरा वेगवान गोलंदाज २०१० मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सेंच्युरियन येथे एकमेव कसोटी खेळला होता. तेव्हापासून, त्याने ७ एकदिवसीय आणि १० टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, परंतु यापूर्वी कधीही पाच दिवसांच्या सामन्यासाठी विचार केला गेला नाही.

उनाडकटने भारताकडून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी पदार्पण केले. त्यानंतर तो एकही कसोटी खेळू शकला नाही. २०१० मध्ये तो दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेला होता. त्याने १ डावात २६ षटके टाकली. मात्र १ विकेटही काढता आली नाही.

नुकतेच सौराष्ट्रला चॅम्पियन बनवले –

उनाडकट हा विजय हजारे ट्रॉफी २०२२ मध्ये सौराष्ट्र संघाचा कर्णधार होता. या स्पर्धेत त्याने १० सामन्यांत एकूण १९ बळी घेतले. त्याच्या नेतृत्वाखाली १४ वर्षांनंतर सौराष्ट्र चॅम्पियन झाला. भारतीय देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात यशस्वी वेगवान गोलंदाजांपैकी एक, उनाडकटने त्याच्या ९६ सामन्यांच्या कारकिर्दीत ३५३ बळी घेतले आहेत. ज्यामध्ये रणजी ट्रॉफीच्या २०१९-२० च्या विक्रमी हंगामाचाही समावेश आहे. ज्यामध्ये त्याने ६७ विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत.

हेही वाचा – IND vs BAN 3rd ODI: नाणेफेक जिंकून बांगलादेशचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय; पाहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

शमीशिवाय कर्णधार रोहित शर्माच्या दुखापतीमुळे टीम इंडियाही हैराण झाली आहे. बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याच्या अंगठ्याला दुखापत झाली होती, त्यामुळे तो वनडे मालिकेतून बाहेर पडला आहे. रोहितसाठी बांगलादेशविरुद्ध पहिली कसोटी खेळणेही कठीण दिसत आहे. रोहितची दुखापत बरी झाल्यास तो दुसऱ्या कसोटीत पुनरागमन करू शकतो.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs ban test series jaydev unadkat will return to team india after 12 years to replace mohammad shami vbm
First published on: 10-12-2022 at 12:19 IST