India vs England 1st Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला दमदार सुरूवात झाली आहे. हा सामना हेडिंग्लेच्या मैदानावर सुरू आहे. इंग्लंडचा कर्णधार शुबमन गिलने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. प्रथम फलंदाजी करताना भारतीय फलंदाजांनी यजमान इंग्लंडच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. सामन्यातील पहिल्याच दिवशी भारतीय संघाने ३५० हून अधिक धावांचा डोंगर उभारला. दरम्यान सामना झाल्यानंतर ज्यावेळी ऋषभ पंत आणि केएल राहुल ड्रेसिंग रूममध्ये परतले, त्यावेळी केएल राहुलने ऋषभ पंतला हात जोडले. हा व्हिडीओ बीसीसीआयने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केला आहे.
सामन्यातील पहिल्या दिवशी भारताच्या कर्णधार आणि उपकर्णधारांच्या जोडीने इंग्लंडच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. ऋषभ पंत पहिल्या दिवशी ६५ धावांवर नाबाद माघारी परतला. त्याने आक्रमक फलंदाजी करत डावाची सुरूवात केली आणि शेवटही तसाच केला. दिवसाच्या सुरूवातीला फलंदाज फलंदाजी करत असताना आपला विकेट वाचवण्याच्या प्रयत्नात असतात. त्यामुळे ते मोठे फटके खेळणं टाळतात. मात्र,पंतने उलटं केलं. त्याने दिवसाच्या शेवटच्या षटकातील पहिल्याच चेंडूवर स्टेप आऊट होऊन ख्रिस वोव्सच्या गोलंदाजीवर खणखणीत षटकार मारला. हे पाहूण इंग्लंडच्या खेळाडूंनाही आश्चर्याचा धक्का बसला.
पहिल्या दिवसातील खेळ संपल्यानंतर, शुबमन गिल आणि ऋभष पंतची जोडी ड्रेसिंग रूममध्ये पोहोचली त्यावेळी खेळाडू आणि सपोर्ट स्टाफमधील सदस्यांनी टाळ्या वाजवून दोघांचं कौतुक केलं. तर केएल राहुलने हात जोडले. कारण ऋषभ पंत काय करू शकतो, हे त्याला चांगलच माहित आहे.
भारतीय संघाची धावसंख्या ४०० पार
या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडचा हा निर्णय फसला. कारण, भारतीय फलंदाजांनी दमदार सुरूवात करून दिली. सलामीला फलंदाजीला आलेल्या केएल राहुल आणि यशस्वी जैस्वालने ९१ धावांची भागीदारी केली. यशस्वीने १०१ धावांची खेळी केली. तर केएल राहुलने ४३ धावांची खेळी केली. कर्णधार शुबमन गिलने १४७ धावांची खेळी केली. दुसऱ्या दिवशी फलंदाजी करताना, ऋषभ पंतने आपलं शतक पूर्ण केलं. दोघांनी मिळून २०० धावा जोडल्या. यासह संघाची धावसंख्या ४०० पार पोहोचवली.