इंग्लंडविरूद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात भारताचा डाव ३२९ धावांवर संपुष्टात आला. गेल्या काही सामन्यात सातत्याने टीकेचे लक्ष ठरणाऱ्या सलामीवीर रोहित शर्माने धडाकेबाज दीडशतक ठोकलं. शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहली हे वरच्या फळीतील फलंदाज स्वस्तात बाद झाले. पण रोहितला उपकर्णधार अजिंक्य रहाणेने साथ दिल्यामुळे भारताने त्रिशतकी मजल मारली. पहिल्या दिवसाच्या खेळात रोहितच्या खेळीइतकीच त्याची पत्नी रितिका हिच्या एका गोष्टीने लक्ष वेधून घेतलं.

IND vs ENG: रोहित शर्माचा पराक्रम; ख्रिस गेलच्या विक्रमाशी केली बरोबरी

रोहितने दमदार खेळी करत पहिला दिवस गाजवला. २३१ चेंडूत त्याने १८ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने १६१ धावा केल्या. रोहितला पाठिंबा देण्यासाठी त्याची पत्नी रितिका स्टेडियममध्ये हजर होती. एखादी गोष्ट चांगली व्हावी म्हणून पाश्चिमात्त्य देशांमध्ये हाताची बोटं एकमेकांत गुंतवून ठेवण्याची (फिंगर्स क्रॉस) पद्धत आहे. तशापद्धतीने रितिका दिवसभर स्टेडियममध्ये बसली होती. त्यामुळे दिवसाचा खेळ संपल्यानंतर रोहितची लेक समायरा आणि स्वत: रोहित यांनी रितिकाच्या बोटांना मसाज केला. रोहितने हा फोटो ट्विटरवर पोस्ट केला. या फोटोमुळे बेबी समायराने चाहत्यांची मनं जिंकली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

Video: रोहितचा उत्तुंग षटकार; पत्नी रितिकाही झाली फिदा

दरम्यान, भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. शुबमन गिल (०), चेतेश्वर पुजारा (२१), विराट कोहली (०) हे तिघे स्वस्तात बाद झाले. रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे यांनी १६२ धावांची भागीदारी केली. रोहित दीडशतक (१६१) ठोकून तर अजिंक्य अर्धशतक (६७) झळकावून माघारी परतला. त्यानंतर ऋषभ पंतच्या नाबाद अर्धशतकी (५८) खेळीव्यतिरिक्त इतर फलंदाजांनी निराशा केली. पंतच्या फटकेबाजीच्या बळावर भारताने ३२९ धावांपर्यंत मजल मारली. मोईन अलीने ४, ओली स्टोनने ३, जॅक लीचने २ तर कर्णधार रूटने १ बळी घेतला.