Devdutt Padikkal Test Debut : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना खेळला जात आहे. धर्मशाला येथे सुरू असलेल्या सामन्यात देवदत्त पडिक्कलला पदार्पणाची संधी मिळाली. रविचंद्रन अश्विन हा १०० वी कसोटी खेळत असताना त्याला पदार्पणाची कॅप दिली. त्याने पहिल्या डावात भारतासाठी ६५ धावा केल्या. चौथ्या क्रमांकावर आलेल्या या फलंदाजाने १० चौकार आणि एक षटकार मारला. या शानदार कामगिरीने त्याने नवा विक्रम केला आहे.

पडिक्कल ३७ वर्षांनंतर चौथ्या क्रमांकावर पदार्पण करणारा पहिला फलंदाज ठरला –

विराट कोहली आणि सचिन तेंडुलकरसारख्या दिग्गज फलंदाजांनी दोन दशके व्यापलेल्या पहिल्या कसोटीत केरळच्या डावखुऱ्या फलंदाजाला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीची संधी मिळाली. १९८८ नंतर या स्थानावर पदार्पण करणारा पडिक्कल हा पहिला भारतीय फलंदाज ठरला. त्याच्या आधी डब्लू व्ही रमण यांनी स्थानावर पदार्पण केले होते. त्यांच्या आधी, केवळ आठ भारतीय फलंदाज, सीके नायडू, विजय हजारे, हेमू अधिकारी, रामनाथ केणी, अपूर्व सेनगुप्ता, मन्सूर अली खान पतौडी, गुंडप्पा विश्वनाथ आणि रमन यांनी पदार्पणाच्या कसोटीत चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केली होती.

IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
MI vs CSK: आयपीएल २०२४ मध्ये ऋतु’राज’, मुंबईविरूद्ध विस्फोटक फलंदाजीसह ‘हा’ विक्रम करणारा पहिला भारतीय खेळाडू
Shubman Gill Surpasses Virat Kohli and Sanju Samson in Unique Record
IPL 2024: शुबमन गिलने विराट-सॅमसनला मागे टाकत रचला इतिहास, आयपीएलमध्ये हा पराक्रम करणारा ठरला पहिला खेळाडू
IPL 2024 Royal Challenger Bengaluru vs Lucknow Super Giants Match Updates in Marathi
IPL 2024 RCB vs LSG: विराट कोहलीला आऊट करत घेतली आयपीएल कारकिर्दीतील पहिली विकेट, कोण आहे मनिमरण सिध्दार्थ?
list of fastest bowlers in IPL 2024 and whole History
उमरान मलिकचा विक्रम मोडणार मयंक यादव? IPL मधील सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम कोणाच्या नावावर? पाहा यादी

पदार्पणाच्या कसोटीच्या पहिल्या डावात नवा विक्रम केला –

२३ वर्षीय देवदत्त पडिक्कलने पदार्पणाच्या कसोटीत आणखी एक विक्रम केला. इंग्लंडविरुद्धची त्याची ६५ धावांची खेळी ही एका डावात चौथ्या क्रमांकावर पदार्पण करणाऱ्या भारतीय खेळाडूची दुसरी सर्वोच्च खेळी आहे. पडिक्कलपूर्वी केवळ विश्वनाथ यांनी कानपूरमध्ये (१९६९) ऑस्ट्रेलियाविरुद्ध १३७ धावा केल्या होत्या.

हेही वाचा – IND vs ENG 5th Test : टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध रचला इतिहास! १५ वर्षानंतर केला ‘हा’ खास पराक्रम

सामन्याबद्दल बोलायचे, तर झॅक क्रॉऊलीच्या अर्धशतकामुळे इंग्लंडने पहिल्या डावात स्फोटक फलंदाजी करत २१८ धावा केल्या होत्या. यादरम्यान कुलदीप यादवने पाच आणि अश्विनने चार विकेट घेतल्या. त्याचवेळी जडेजाला एक यश मिळाले. याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय संघ दमदार कामगिरी करताना दिसत आहे. भारताने २५५ धावांची आघाडी घेतली आहे. रोहित शर्मा आणि शुबमन गिलने शानदार शतके झळकावली.