Indian team lead by 255 runs till the end of the second day : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना धर्मशाला येथे खेळला जात आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत टीम इंडियाने पहिल्या डावात आठ गडी गमावून ४७३ धावा केल्या आहेत. सध्या कुलदीप यादव २७ धावांवर आणि जसप्रीत बुमराह १९ धावांवर नाबाद आहे. इंग्लंडने पहिल्या डावात २१८ धावा केल्या होत्या. दुसऱ्या दिवशी टीम इंडियाने रोहित शर्मा आणि शुबमनच्या शतकाच्या जोरावर आघाडी २५५ धावांवर पोहोचली आहे. भारतीय संघाला तिसऱ्या दिवशी ही आघाडी आणखी वाढवायची आहे.

भारताच्या पहिल्या पाच फलंदाजांनी ५० पेक्षा जास्त धावा केल्या –

पाचव्या कसोटीत भारताच्या आघाडीच्या पाच फलंदाजांनी ५० हून अधिक धावा केल्या. यामध्ये रोहित शर्माने १०३ धावांची तर शुबमन गिलने ११० धावांची खेळी केली. यशस्वी जैस्वालने ५७ धावा, नवोदित देवदत्त पडिक्कलने ६५ आणि सर्फराझ खानने ५६ धावा केल्या. कसोटी क्रिकेटमध्ये गेल्या १५ वर्षांत प्रथमच भारताच्या पहिल्या पाच फलंदाजांनी ५० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. त्याचबरोबर इंग्लंडविरुद्ध पहिल्यादाच हा पराक्रम केला आहे.

Delhi beat Gujarat by 4 runs Shubman Gill reacts to defeat
DC vs GT : दिल्लीविरुद्धच्या पराभवानंतर कर्णधार शुबमन गिल संतापला, ‘या’ खेळाडूला धरले जबाबदार
Sandeep Sharma may replace Shami
RR vs MI : टीम इंडियाच्या तिसऱ्या वेगवान गोलंदाजाचा शोध संपला! ‘हा’ गोलंदाज घेऊ शकतो मोहम्मद शमीची जागा
IPL 2024 Gujarat Titans vs Punjab Kings Match Updates in Marathi
IPL 2024: शुबमन गिलच्या नावे आयपीएलमध्ये अजून एक मोठा रेकॉर्ड; रोहित, विराट, रहाणे सर्वांनाच टाकलं मागे
Kolkata Knight Riders vs Delhi Capitals Match Updates in Marathi
DC vs KKR : केकेआरने रचला इतिहास! सुनील नरेनच्या वादळी खेळीच्या जोरावर दिल्लीसमोर ठेवले २७३ धावांचे लक्ष्य

सर्फराझ आणि पडिक्कल यांच्यात ९७ धावांची भागीदारी –

रोहित १६२ चेंडूत १३ चौकार आणि ३ षटकारांसह १०३ धावा करून बाद झाला. शुबमन गिल १५० चेंडूत ११० धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. गिलने आपल्या खेळीत १२ चौकार आणि ५ गगनचुंबी षटकार मारले. हे दोघेही बाद झाल्यानंतर पहिली कसोटी खेळत असलेल्या सर्फराझ खान आणि देवदत्त पडिक्कल यांनी जबाबदारी स्वीकारली. दोघांनी ९७ धावांची भागीदारी केली. सर्फराझने ६० चेंडूंच्या खेळीत ८ चौकार आणि १ षटकार मारला. तर पडिक्कल १०३ चेंडूत ६५ धावा करून बाद झाला. त्याने १० चौकार आणि एक षटकार मारला. मात्र, रविचंद्रन अश्विन आपल्या १००व्या कसोटीत शून्यावर बाद झाला.

हेही वाचा – IND vs ENG 5th Test : बेन स्टोक्सचे शानदार पुनरागमन! पहिल्याच चेंडूवर रोहित शर्माला केले क्लीन बोल्ड, पाहा VIDEO

बुमराह आणि कुलदीपनेही इंग्रजांना फोडला घाम –

भारतीय संघाने ४२८ धावांवर ८ विकेट गमावल्यानंतर कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराह यांनीही इंग्लंडच्या गोलंदाजांची दमछाक केली. दोघांनी नवव्या विकेटसाठी १०८ चेंडूत ४५ धावांची भागीदारी केली. टीम इंडिया आजच ऑलआऊट होईल असे वाटत होते, पण बुमराह आणि कुलदीपने तसे होऊ दिले नाही. दोघांनी गोलंदाजीबरोबर फलंदाजीतही मोलाचे योगदान दिले. इंग्लंडकडून गोलंदाजी करताना फिरकीपटू शोएब बशीरने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर टॉम हार्टलीने २ तर अँडरसन आणि स्टोक्सने १ विकेट घेतली.