IND vs ENG 1st Test: भारतीय संघाने इंग्लंडसमोर विजयासाठी ३७१ धावांचं मोठं आव्हान ठेवलं आहे. या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडला चांगल्या सुरुवातीची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना बेन डकेट आणि जॅक क्रॉली या जोडीने दमदार सुरुवात करून दिली आहे. दोघांनी मिळून दमदार सुरूवात केली. बेन डकेटने १२१ चेंडूंचा सामना करत आपलं शतक पूर्ण केलं. यासह त्याच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे.

बेन डकेटचं विक्रमी शतक

या सामन्यातील पहिल्या डावातही फलंदाजी करताना बेन डकेटने दमदार सुरूवात करून दिली होती. त्याने ६२ धावांची सलामी दिली होती. त्यानंतर जसप्रीत बुमराहने त्याला बाद करत माघारी धाडलं होतं. आता दुसऱ्या डावात त्याने १२१ चेंडूंचा सामना करत आपलं शतक पूर्ण केलं आहे. यासह १५ वर्षांनंतर तो इंग्लंडसाठी चौथ्या डावात शतक झळकावणारा पहिलाच सलामीवीर ठरला आहे. ही खेळी त्याने तेव्हा केली आहे जेव्हा इंग्लंडला सर्वात जास्त गरज होती. हे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील ६ वे शतक ठरले आहे. मुख्य बाब म्हणजे ९७ धावांवर फलंदाजी करत असताना यशस्वी जैस्वालने सोपा झेल सोडला. जर हा झेल सोडला नसता तर बेन डकेटचं शतक पूर्ण झालं नसतं. त्याचं शतक ४ धावांनी हुकलं असतं.

या शतकी खेळीसह त्याने आणखी एक मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. २०१९ नंतर सर्वाधिक शतकं झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत त्याने उस्मान ख्वाजाची बरोबरी केली आहे. या यादीत भारताचा माजी फलंदाज रोहित शर्मा अव्वल स्थानी आहे. रोहितने २०१९ नंतर कसोटी क्रिकेटमध्ये सलामीवीर फलंदाज म्हणून ९ शतकं झळकावली आहेत. तर श्रीलंकेच्या दिमुथ करुणारत्नेने ८ शतकं झळकावली आहेत. आता बेन डकेट या यादीत तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे. त्याच्या नावे ६ शतकं झळकावण्याची नोंद आहे. तर उस्मान ख्वाजाच्या नावे देखील ६ शतकं झळकावण्याची नोंद आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये २०१९ नंतर सर्वाधिक शतकं झळकावणारे सलामीवीर फलंदाज

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रोहीत शर्मा –९
दिमुथ करुणारत्ने –८
बेन डकेट – ६
उस्मान ख्वाजा –६