भारत आणि इंग्लंड दरम्यान ‘पतौडी चषका’तील पाचवा आणि निर्णयक सामना एजबस्टन येथे खेळवला जात आहे. आज या सामन्याचा तिसरा दिवस आहे. भारतीय संघाला चांगली आघाडी मिळाली आहे. अशातच भारताचा माजी कर्णधार विराट कोहली आणि इंग्लंडचा फलंदाज जॉनी बेअरस्टोमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर बेअरस्टोने कसोटी कारकिर्दीतील ११वे शतक पूर्ण केले. याबाबत माजी भारतीय फलंदाज विरेंद्र सेहवागने मजेशीर ट्वीट केले आहे. त्याचे हे ट्वीट व्हायरल झाले असून चाहत्यांनी त्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

तिसऱ्या दिवसाचा खेळ वेळेत सुरू झाला. मात्र, सुरुवातीलाच विराट कोहली आणि जॉनी बेअरस्टो यांच्यात वाद झाला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये भारताचा माजी कर्णधार हातवारे करताना दिसला. त्यानंतर त्याने बेअरस्टोला गप्प राहण्याचाही इशारा केला. हा वाद झाल्यानंतर जॉनी बेअरस्टोने अचानक आपल्या खेळाची गती वाढवली. ही गोष्ट लक्षात घेऊन सेहवागने एक ट्वीट केले आहे.

‘विराट कोहलीने स्लेजिंग करण्यापूर्वी बेअरस्टोचा स्ट्राईक रेट २१ होता, स्लेजिंगनंतर तो १५० झाला. बेअरस्टो पुजारासारखा सावकाश खेळत होता. त्याच्यासोबत वाद घालून कोहलीने त्याला पंतप्रमाणे फटकेबाजी करण्यास प्रवृत्त केले,’ अशा आशयाचे ट्वीट विरेंद्र सेहवागने केले आहे.

हेही वाचा – IND vs ENG Edgbaston Test : अँडरसनच्या टोमणेबाजीला रविंद्र जडेजाचे सडेतोड उत्तर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, फलंदाजीसाठी उतरलेल्या यजमान इंग्लंडला सर्वबाद २८४ धावांपर्यंत मजल मारता आली. आपल्या पहिल्या डावात इंग्लंडची फलंदाजी सपशेल ढेपाळली होती. मात्र, जॉनी बेअरस्टोच्या शतकी खेळीमुळे त्यांना फॉलोऑन टाळण्यात यश आले.