India vs England ODI series 2025 full schedule in Marathi: सध्या इंग्लंडचा संघ भारतीय दौऱ्यावर आहे. भारताने इंग्लंडविरूद्धच्या ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेत ४-१ ने दणदणीत मालिका विजय नोंदवला. वानखेडेच्या मैदानावर झालेल्या सामन्यात भारताने अभिषेक शर्माच्या विक्रमी खेळीच्या जोरावर मोठी धावसंख्या नोंदवत शानदार विजय नोंदवला. यानंतर आता दोन्ही संघ वनडे मालिका खेळण्यासाठी सज्ज झाले आहेत.

भारत आणि इंग्लंड यांच्यात ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जाणार आहे, जी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या तयारीसाठी देखील महत्त्वाची मानली जाते. टी-२० मालिकेत इंग्लंड संघाचा पराभव केल्यानंतर भारताची नजर आता एकदिवसीय मालिकेवर असेल आणि रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया विजयी घोडदौड कायम राखण्याचा प्रयत्न करेल. इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा आधीच करण्यात आली आहे. यानंतर आता संघात बदलदेखील करण्यात आला आहे. भारताचा मिस्ट्री स्पिनर वरूण चक्रवर्तीला संघात सामील केलं आहे.

एकदिवसीय मालिकेतील इंग्लंडच्या संघाचे कर्णधारपद जोस बटलरकडे असेल आणि टी-२० मालिकेतील पराभवानंतर संघ एकदिवसीय मालिकेत चांगली कामगिरी करून मनोबल वाढवून चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये जाण्याचा प्रयत्न करेल. स्टार फलंदाज जो रूटचा इंग्लंडच्या एकदिवसीय संघात समावेश करण्यात येणार आहे आणि स्वतः कर्णधार जोस बटलरने शेवटच्या टी-२० सामन्यानंतर याबद्दल माहिती दिली होती. जो रूटच्या येण्याने इंग्लंड संघाची फलंदाजी अधिक मजबूत होणार आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील ३ सामन्यांच्या वनडे मालिकेला ६ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे, म्हणजेच पहिला सामना या दिवशी तर दुसरा सामना ६ फेब्रुवारी रोजी खेळवला जाईल. या मालिकेतील तिसरा सामना १२ फेब्रुवारीला होणार आहे. भारतीय वेळेनुसार हे तिन्ही सामने दुपारी १.३० वाजता सुरू होतील.

भारत विरुद्ध इंग्लंड एकदिवसीय मालिकेचे पूर्ण वेळापत्रक

पहिला एकदिवसीय सामना – ६ फेब्रुवारी – नागपूर – दुपारी १.३० वा
दुसरा एकदिवसीय सामना – ९ फेब्रुवारी – कटक – दुपारी १.३० वा
तिसरा एकदिवसीय सामना – १२ फेब्रुवारी – अहमदाबाद – दुपारी १.३० वा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इंग्लंडविरूद्ध वनडे मालिकेसाठी भारताचा संघ

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, हर्षित राणा , मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती.