भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने पदाचा राजीनामा दिल्यानंतर ही जबाबदारी रोहित शर्माच्या खांद्यावर देण्यात आली. रोहित शर्मानेही आतापर्यंत ही जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडल्याचे दिसत आहे. इंग्लंड विरुद्ध झालेला पहिला टी २० सामना जिंकून रोहित सलग १३ टी २० सामने जिंकणारा पहिला कर्णधार ठरला आहे. त्याच सामन्यात त्याने कर्णधार म्हणून सर्वात जलद एक हजार धावा पूर्ण करण्याचीही कामगिरी केली. आता इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी २० सामन्यातही त्याला आणखी एक विक्रम करण्याची संधी आहे. विशेष म्हणजे माजी कर्णधार विराट कोहलीदेखील त्याच्यासोबत स्पर्धा करताना दिसणार आहे.

आज (९ जुलै) बर्मिंगहॅममधील एजबस्टनमध्ये दुसऱ्या टी २० सामन्यात रोहित शर्मा आणि विराट कोहलीला एक विक्रम करण्याची संधी आहे. आंतरराष्ट्रीय टी २० सामन्यांमध्ये ३०० चौकार पूर्ण करण्याची संधी या दोघांकडे आहे. आतापर्यंत केवळ आयर्लंडच्या पॉल स्टर्लिंगला ३०० टी २० चौकार मारण्याची कामगिरी करता आली आहे. रोहित किंवा विराटने आजच्या सामन्यात दोन चौकार मारले तर ते स्टर्लिंगच्या क्लबमध्ये दाखल होतील.

हेही वाचा – SL vs AUS Test Series: आता तर स्मिथनेही ठोकले शतक; विराट कोहली मात्र अजूनही प्रतिक्षेतच

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आयर्लंडच्या पॉल स्टर्लिंगने आतापर्यंत १०४ सामन्यांत ३२५ चौकार मारले आहेत. अशी कामगिरी करणारा तो जगातील एकमेव खेळाडू आहे. विराट आणि रोहित दोघांच्या नावावर सध्या २९८ टी २० चौकार आहेत. त्यामुळे आज या दोघांपैकी स्टर्लिंगच्या क्लबमध्ये कोण अगोदर दाखल होणार, याबाबत उत्सुकता आहे. मालिकेतील पहिल्या टी-२० सामन्यामध्ये कोहलीला विश्रांती देण्यात आली होती. याआधी तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेतही खेळला नव्हता.