भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला आज सुरुवात झाली आहे. ऑकलंड येथे खेळल्या जात असलेल्या पहिल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने ७ गडी गमावून ३०६ धावा केल्या. कर्णधार शिखर धवनने ७२ आणि शुबमन गिलने ५० धावा केल्या. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी १२४ धावांची भागीदारी केली. त्याचबरोबर श्रेयस अय्यरने देखील अर्धशतक झळकावत एक विक्रम आपल्या नावावर केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

श्रेयस अय्यरने ७६ चेंडूत ८० धावांची खेळी खेळली. श्रेयसने आपल्या खेळीत चार चौकार आणि चार षटकार मारले. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट १०५.२६ होता. त्याचबरोबर तो भारताकडून सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला.ही इनिंग खेळण्यासोबतच श्रेयसने एक खास विक्रम आपल्या नावावर केला.

न्यूझीलंडच्या भूमीवर वनडेमधली ही त्याची सलग चौथी ५० पेक्षा जास्त धावांची चौथी खेळी आहे. अशी कामगिरी करणारा तो भारताचा पहिला फलंदाज ठरला आहे. श्रेयसने यापूर्वी १०७ चेंडूत १०३ धावा, ५७ चेंडूत ५२ धावा, ६३ चेंडूत ६२ धावा केल्या होत्या. २०२० मध्ये भारताच्या न्यूझीलंड दौऱ्यावर त्याने हे तीन डावात ही कामगिरी केली होती.

श्रेयस अय्यरने रमीझ राजाची केली बरोबरी –

न्यूझीलंड दौऱ्यावर असलेल्या संघाच्या फलंदाजाने अशी कामगिरी करण्याची ही दुसरी वेळ आहे. त्याच्या आधी पाकिस्तानचा माजी कर्णधार रमीझ राजाने ही कामगिरी केली होती. श्रेयसने आता रमीझ राजाची बरोबरी केली आहे. रमीझने न्यूझीलंड दौऱ्यावर वनडेमध्ये चार वेळा ५०पेक्षा जास्त धावांची खेळी केली आहे. श्रेयसशिवाय संजू सॅमसनने ३८ चेंडूत ३६ धावांची खेळी केली. त्याचवेळी वॉशिंग्टन सुंदरने १६ चेंडूंत तीन चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने नाबाद ३७ धावांची खेळी केली.

हेही वाचा – IND vs NZ 1st ODI: वॉशिंग्टन सुंदरने मॅट हेन्रीला झोपून लगावला अप्रतिम चौकार, पाहा व्हिडिओ

दरम्यान ३०७ धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या न्यूझीलंड संघाने ४३ षटकांत ३ बाद २६५ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर त्यांना आता विजयासाठी ४२ चेंडूत ४२ धावांची गरज आहे. सध्या खेळपट्टीवर केन विल्यमसन अर्धशतक आणि टॉम लॅथम शतक करुन खेळत आहे. त्यामुळे भारतीय संघाच्या अडचणी वाढल्या आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs nz 1st odi shreyas iyer equaled rameez rajas record by scoring a half century against new zealand vbm
First published on: 25-11-2022 at 15:00 IST