भारतीय संघाने दमदार कामगिरी करत ऑस्ट्रेलियाविरूद्ध एकदिवसीय मालिका २-१ ने जिंकली. पहिल्या सामन्यात पराभूत होऊनही भारताने जोरदार पुनरागमन केले आणि मालिका खिशात घातली. या मालिकेत केवळ २ डाव खेळणारा आणि दोनही डावात अर्धशतक करणारा भारतीय फलंदाज शिखर धवन न्यूझीलंड दौऱ्यातून बाहेर झाला असल्याची चर्चा आहे. ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याला दुखापत झाली होती. त्या दुखापतीतून पूर्णपणे न सावरल्यामुळे त्याला न्यूझीलंड दौऱ्याला मुकावे लागणार आहे.

ICC ODI Rankings : विराट, रोहितचं साम्राज्य अबाधित; जाडेजाचा दुहेरी धमाका

भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर २४ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान ५ टी २० सामने खेळणार आहे. त्यानंतर ५ ते ११ फ्रेब्रुवारी दरम्यान ३ एकदिवसीय मालिका होणार आहे. तर दौऱ्याच्या अखेरीस २१ फेब्रुवारी ते ४ मार्च या दरम्यान २ कसोटी सामने खेळणार आहेत. या मालिकेसाठी शिखर धवन याला संघात स्थान देण्यात आले होते, पण त्याला आता दौऱ्यातून माघार घ्यावी लागली असल्याचे वृत्त मुंबई मिररने दिले आहे. मात्र शिखर धवनच्या जागी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) अद्याप बदली खेळाडूची घोषणा केलेली नाही.

वाचा सविस्तर : भारतानं ऑस्ट्रेलियाला अक्षरश: ठेचलं – शोएब अख्तर

एकदिवसीय क्रमवारीत धवनची मोठी झेप

भारताकडून संघात पुनरागमन करणाऱ्या शिखर धवनने सात स्थानांची झेप घेत १५ वे स्थान पटकावले. त्याने केवळ २ सामन्यात १७० धावा केल्या. पहिल्या सामन्यात शिखर धवनने ७४ धावांची खेळी केली. तर दुसऱ्या सामन्यात तो ९६ धावांवर बाद झाला. दोनही सामन्यात त्याला शतकाने हुलकावणी दिली. तर तिसऱ्या सामन्यात धवनला दुखापतीमुळे फलंदाजी करण्यात आली आहे.