न्यूझीलंडविरुद्ध वन-डे सामन्यांच्या मालिकेत कर्णधार विराट कोहलीच्या मागे ग्रहण लागलेलं आहे. पहिल्या दोन सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर, तिसऱ्या वन-डे सामन्यातही भारतीय फलंदाजांची अडखळती सुरुवात झाली. महत्वाची गोष्ट म्हणजे कर्णधार विराट कोहलही अखेरच्या सामन्यात अपयशी ठरला. ९ धावांवर हमिश बेनेटने विराटला माघारी धाडलं.
यामुळे ३ वन-डे सामन्यांच्या मालिकेत एकही शतक न झळकावण्याची विराटची ही पहिलीच वेळ ठरली आहे.
For 1st time, Virat Kohli not scored century in 3 Consecutive bilateral Odi series#NZvIND
— CricBeat (@Cric_beat) February 11, 2020
दरम्यान विराट कोहली माघारी परतल्यानंतर श्रेयस अय्यरने सर्वात आधी पृथ्वी शॉ आणि त्यानंतर लोकेश राहुलच्या साथीने भागीदारी करत संघाचा डाव सावरला. यादरम्यान लोकेशने आपलं अर्धशतकही पूर्ण केलं.