scorecardresearch

IND vs NZ 3rd ODI: “सूर्यकुमार चेज मास्टर बनू शकत नाही कारण…”, खराब प्रदर्शनानंतर चाहते भडकले

भारत-न्यूझीलंड एकदिवसीय मालिकेत सूर्यकुमार यादवच्या खराब कामगिरीवर सोशल मीडियात पडसाद उमटले. सध्या टीम इंडिया ही मालिका वाचवणार का याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

IND vs NZ 3rd ODI: “सूर्यकुमार चेज मास्टर बनू शकत नाही कारण…”, खराब प्रदर्शनानंतर चाहते भडकले
सौजन्य- बीसीसीआय (ट्विटर)

टीम इंडियाचा फलंदाज सूर्यकुमार यादवचा एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटचा काळ आणखी एका खराब खेळीसह कायम राहिला. बुधवार, ३० नोव्हेंबर रोजी न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात हा खेळाडू १० चेंडूंत अवघ्या सहा धावा करून बाद झाला. ख्राईस्टचर्चच्या हॅगली ओव्हलवर सूर्यकुमारची बाद होण्याची पद्धत ही पहिल्या एकदिवसीय सामन्यातील बाद होण्याच्या पद्धतीला प्रतिबिंबित करते. अॅडम मिल्नेने त्याला या सामन्यात बाद केले. त्याच्या बॅटची बाहेरील कडेचा वेध घेत, चेंडू पहिल्या स्लिपच्या दिशेने उडाला. यष्टीरक्षकाच्या शेजारी उभ्या असलेल्या स्लीपमधील टीम साऊदीने झेल घेत सूर्यकुमारची छोटीशी खेळी संपवली.

पहिल्या एकदिवसीय सामन्यात लवकर बाद झाल्यानंतर, हॅमिल्टनमधील सामन्यात सूर्यकुमार फॉर्ममध्ये दिसला. त्याने २५ चेंडूंत नाबाद ३२ धावा केल्या होत्या आणि पावसामुळे तो सामना रद्द करावा लागला. मात्र तो त्या खेळीची पुनरावृत्ती करू शकला नाही आणि त्याने केवळ एक अंकी गुणांसह न्यूझीलंडच्या दौऱ्याचा समारोप केला.

गेल्या वर्षी श्रीलंका दौऱ्यावर एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करताना, सूर्यकुमारने आपल्या कारकिर्दीची सुरुवात मधल्या फळीत विश्वासार्ह धावसंख्येसह सहजतेने केली. मात्र, यावर्षी ५० षटकांच्या फॉरमॅटमध्ये तो धावा करू शकलेला नाही. त्याने ११ डावांमध्ये केवळ एक अर्धशतक आणि सरासरी २८.२२ धावा केल्या आहेत.

हेही वाचा :   IND vs NZ 3rd ODI: वॉशिंग्टन सुंदरचे झुंजार अर्धशतक! न्यूझीलंडच्या भेदक माऱ्यापुढे भारताने केल्या केवळ २१९ धावा

एकदिवसीय सामन्यांमध्ये धावांचा पाठलाग करताना त्याच्या सततच्या निराशाजनक खेळीमुळे चाहत्यांनी ट्विटरवर निराशा व्यक्त केली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील काही प्रतिक्रिया येथे आहेत:

न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात भारताची अवस्था बिकट झाली आहे. नाणेफेक जिंकून यजमानांनी टीम इंडियाला फलंदाजीला आमंत्रित केले. मात्र सलामीवीर शिखर धवन (२८) आणि शुबमन गिल (१३) फारशी काही चांगली कामगिरी करू शकले नाही. श्रेयस अय्यर एका बाजूने खिंड लढवत असताना त्याची झुंज देखील अपयशी ठरली. त्याने ५९ चेंडूत ४९ धावा केल्या. अखेर वॉशिंग्टन सुंदरच्या एकाकी खेळीच्या जोरावर भारताने न्यूझीलंडसमोर २२० धावाचे लक्ष ठेवले.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-11-2022 at 11:39 IST

संबंधित बातम्या