ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील रविवारी झालेल्या ‘अव्वल-१२’ फेरीच्या सामन्यात न्यूझीलंडने भारतावर आठ गडी आणि ३३ चेंडू राखून आरामात विजय मिळवला. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात भारतीय संघाची फलंदाजी सपशेल अपयशी ठरली आणि संघाला निर्धारित २० षटकात सात गडी गमावून ११० धावाच करता आल्या. भारतीय संघाकडून रवींद्र जडेजाने सर्वाधिक नाबाद २६ धावा केल्या. आघाडीच्या फळीतील फलंदाज फ्लॉप ठरले. मात्र, सामन्यात काही बदलही पाहायला मिळाले. रोहित शर्मा सलामीऐवजी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला होता. त्याच्या जागी ईशान किशनने लोकेश राहुलसोबत सामन्याला सुरुवात केली होती.

२०१३ नंतर दुसऱ्यांदा रोहित शर्माने सलामीवीर म्हणून सामन्याला सुरुवात केली नाही. पण पहिली विकेट पडल्यानंतर लगेचच तो मैदानात आला, पण पहिल्याच चेंडूवर रोहितही बाद होता होता वाचला.

तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या रोहित शर्माची सुरुवात चांगली झाली नाही. मुंबई इंडियन्समध्ये त्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या ट्रेंट बोल्टने एक शॉर्ट बॉल टाकला, ज्यावर रोहितने पुल करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर चेंडू फाइन लेगवर उभ्या असलेल्या अॅडम मिलनकडे गेला मात्र त्याने अतिशय सोपा झेल सोडला. चेंडू हवेत असेपर्यंत सर्वांनी श्वास रोखून धरला होता. मैदानाव रोहितची पत्नी रितिकाचीही अशीच अवस्था झाली होती.

रोहितने पहिल्या चेंडूवर बाऊन्सर मारण्याचा प्रयत्न केला, पण न्यूझीलंडच्या खेळाडूला सीमारेषेवर मिळालेल्या या संधीचा फायदा घेता आला नाही आणि त्याने एक सोपा झेल सोडला. या संपूर्ण घटनेदरम्यान रोहितची पत्नी रितिका सजदेहचा चेहरा आणि हावभाव पाहण्यासारखे होते. चेंडू हवेत गेल्यावर ती तणावात होती, पण झेल सुटल्याचे पाहून तिने अखेर सुटकेचा नि:श्वास सोडला. रितिकाजवळ उपस्थित फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनची पत्नीही बसली होती. अश्विनची पत्नी पुन्हा रितिकाला सांत्वन देत होती. सामन्यादरम्यानचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मात्र, रोहितला मिळालेले हे जीवनदान जास्त वेळ टिकवता आले नाही. रोहित १४ चेंडूत केवळ १४ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. रोहितने एक चौकार आणि एक षटकार ठोकला. इश सोढीने रोहितला मार्टिन गप्टिलच्या हाती झेलबाद केले. सोढी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताविरुद्ध सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे. कर्णधार विराट कोहली आऊट होताच सोढीने भारताविरुद्ध टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १८ विकेट पूर्ण केल्या. सोढी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताविरुद्ध सर्वाधिक बळी घेणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी आहे. सोढीने भारताविरुद्ध चार षटकांत १७ धावा देत दोन बळी घेतले.