IND vs NZ: विराट कोहलीचा सरावादरम्यान मांजरीसोबत टाईमपास, अनुष्का शर्माच्या कमेंटवर म्हणाला…

कसोटी मालिकेत सामील होण्यापूर्वी विराट कोहलीने मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर सराव सुरू केला आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेला २५ नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. ही मालिका सुरू होण्यापूर्वी दोन्ही संघ कानपूरला पोहोचले आहेत. विराट कोहली कानपूर कसोटीचा भाग नसला तरी तो मुंबई कसोटीत भारतीय संघात सामील होणार आहे. कसोटी मालिकेत सामील होण्यापूर्वी विराट कोहलीने मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर सराव सुरू केला आहे. या सरावादरम्यान त्याने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यावर अनुष्का शर्माने देखील प्रतिक्रिया दिली आहे.

विराट कोहलीने सराव सामन्यादरम्यान मांजरासोबत खेळतानाचे दोन फोटो शेअर केले आहेत. ही छायाचित्रे शेअर करताना विराटने लिहिले आहे की, “सरावात असलेल्या मस्त मांजरीकडून हॅलो”, विराट कोहलीच्या या फोटोवर कमेंट करताना अनुष्का शर्माने लिहिले – “हॅलो बील्ली”.

सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत असलेल्या अनुष्का शर्माच्या या कमेंटवर विराट कोहलीने मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे. अनुष्काच्या कमेंटला उत्तर देताना विराटने लिहिले, “दिल्लीचा लौंडा आणि मुंबईची मांजर” ( launda from delli and mumbai ki billi).

विराट कोहली आयसीसी टी -२० विश्वचषक २०२१ पासून विश्रांतीवर आहे आणि ३ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या भारत विरुद्ध न्यूझीलंड कसोटी सामन्यासाठी टीम इंडियामध्ये सामील होईल. ब्रेक दरम्यान विराट कोहली पत्नी अनुष्का शर्मा आणि मुलगी वामिकासोबत वेळ घालवत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ind vs nz virat kohli timepass with cat during practice anushka sharma comments srk

Next Story
हॉकीबाबतचा फैसला ३ नोव्हेंबरला