India vs Pakistan Asia Cup Final Live Streaming: आशिया चषक २०२५ स्पर्धा शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांनी स्पर्धेतील अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. हा सामना अतिशय खास असणार आहे. कारण क्रिकेटच्या मैदानावर कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जाणारे दोन्ही संघ तब्बल ४१ वर्षांनंतर पहिल्यांदाच आशिया चषकातील अंतिम फेरीत आमनेसामने येणार आहेत. या सामन्यात दोन वेळा भारत – पाकिस्तान पार पडला. साखळी फेरीत आणि सुपर ४ फेरीत झालेल्या सामन्यात भारतीय संघाने बाजी मारली. आता अंतिम सामना जिंकून भारतीय संघ विजयाची हॅट्ट्रिक करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. दरम्यान हा सामना केव्हा, कुठे आणि कधी पाहता येणार? जाणून घ्या या सामन्याबद्दल संपूर्ण माहिती.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अंतिम सामना केव्हा होणार आहे?
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये होणारा सामना आज (२८ सप्टेंबर) रंगणार आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणारा अंतिम सामना कुठे होणार आहे?
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये होणारा सामना दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अंतिम सामना किती वाजता सुरू होईल?
भारत आणि पाकिस्ताना या दोन्ही संघांमध्ये होणारा अंतिम सामना भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता सुरू होईल. तर नाणेफेक ७:३० वाजता होणार आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अंतिम सामना टीव्हीवर लाईव्ह कुठे पाहता येणार?
भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणारा अंतिम सामना टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर लाईव्ह पाहता येणार आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अंतिम सामना मोबाईलवर लाईव्ह कुठे पाहता येणार?
हा सामना तुम्ही सोनी लिव ॲपवर लाईव्ह पाहू शकता.
फ्रीमध्ये कुठे पाहता येणार भारत – पाकिस्तान अंतिम सामना?
जर तुम्ही जियो युजर असाल आणि तुम्ही १७५ रुपयांचा रिचार्ज केला असेल तर तुम्हाला हा सामना फुकटात पाहता येऊ शकतो. कारण या रिचार्जमध्ये तुम्हाला १० जीबी डेटासह १० ओटीटी ॲपचा ॲक्सेस देखील मिळणार आहे.
यासह वोडाफोन युजर जर ९५ रूपयांचा डेटा प्लॅन खरेदी करत असतील. या प्लॅनसह सोनी लिवचं सबस्क्रिप्शन देखील मिळणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही फ्रीमध्ये भारत – पाकिस्तान सामना पाहू शकता.