IND vs PAK Harmanpreet Kaur Avoid Handshake with pakistan captain: भारत आणि पाकिस्तान संघांमध्ये महिला एकदिवसीय विश्वचषकाचा सामना खेळवला जात आहे. या सामन्यात भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने पाकिस्तान संघाला आपली जागा दाखवली आहे. आशिया चषकातील सर्व सामन्यांमध्ये भारताच्या पुरूष संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या कर्णधाराशी आणि संघातील इतर खेळाडूंशी हस्तांदोलन न करण्याचा निर्णय घेतला होता. आता महिला संघानेदेखील याचीच पुनरावृत्ती केली आहे. आज ५ ऑक्टोबरला भारत आणि पाकिस्तान महिला संघांमध्ये सामना खेळवला जात आहे. या सामन्याच्या नाणेफेकीदरम्यान नेमकं काय घडलं, पाहूया.
प्रेमदासा स्टेडियमवर होत असलेल्या महिला एकदिवसीय विश्वचषकाच्या सहाव्या सामन्यात पाकिस्तान महिला संघाविरूद्ध आपला उत्कृष्ट रेकॉर्ड कायम ठेवण्यासाठी टीम इंडिया उतरणार आहे. नाणेफेकीदरम्यान पाकिस्तानची महिला कर्णधार फातिमा सनाबरोबर हरमनप्रीत कौरने हस्तांदोलन केलं नाही.
ना हस्तांदोलन ना नजरानजरा; भारत-पाक महिला सामन्यातील नाणेफेकीदरम्यान पाहा काय घडलं?
पाकिस्तान महिला संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर भारतीय संघ फलंदाजीने सामन्याला सुरूवात करणार आहे. नाणेफेकीदरम्यान संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने पाकिस्तान महिला संघाची कर्णधार फातिमा सना हिच्याशी हस्तांदोलन केले नाही. पुरूष संघाप्रमाणेच भारताच्या महिला संघाने हा निर्णय घेतला आहे. इंडियन एक्सप्रेसने काही दिवसांपूर्वी दिलेल्या अहवालात म्हटलं होतं की, दोन्ही संघांच्या कर्णधारांनी रविवारी नाणेफेकीदरम्यान हस्तांदोलन न करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे भारत आणि पाकिस्तानच्या पुरुष संघांमधील सामन्यांमध्ये दिसणारी परंपरा कायम ठेवण्यात आली.
पाकिस्तानविरूद्ध सामन्यासाठी भारताची प्लेईंग इलेव्हन
प्रतिका रावल, स्मृती मानधना, हरलीन देओल, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, रिचा घोष (यष्टीरक्षक), स्नेह राणा, रेणुका सिंग ठाकूर, क्रांती गौड, श्री चरणी
पाकिस्तानची प्लेईंग इलेव्हन
मुनीबा अली, सदफ शमास, सिद्रा अमीन, रमीन शमीम, आलिया रियाझ, सिद्रा नवाज (यष्टीरक्षक), फातिमा सना (कर्णधार), नतालिया परवेझ, डायना बेग, नश्रा संधू, सादिया इक्बाल
