IND vs PAK ICC Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मधील पाचवा सामना भारत विरुद्ध पाकिस्तान या दोन संघात खेळवला जात आहे. हा सामना आज (२३ फेब्रुवारी) दुबईत सुरू आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि पाकिस्तान आमने सामने असल्यामुळे लाखो प्रेक्षकांचं लक्ष या सामन्याकडे लागलं आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. पाकिस्ताने टॉस जिंकला आणि फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा सामना चांगलाच रंगात आला असून हार्दिक पंड्याने बाबर आझमला आऊट केलं आहे. त्यामुळे पाकिस्तान संघाला चांगली सुरूवात करून देण्यात बाबर आझम अपयशी ठरला. त्यामुळे कोणता संघ बाजी मारणार? याकडे अवघ्या देशाची नजर लागली आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या भारत-पाकिस्तान सामन्यात एक हृदयस्पर्शी क्षणाचा फोटो व्हायरल झाला आहे. टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझमच्या पाठीवर थाप देताना पाहायला मिळाला आहे. पाकिस्तानच्या खेळाडूंनी भारतीय खेळाडूंना भेटू नये आणि मिठीही मारु नये असं आवाहन त्यांच्या चाहत्यांनी केलं होतं. मात्र, तरीही पाकिस्तान फलंदाजीसाठी मैदानात उतरताच विराट कोहली आणि बाबर आझम एकमेकांशी बोलून एकमेकांना शुभेच्छा देताना पाहायला मिळाले.
सामना सुरू होण्यापूर्वी विराट कोहलीने बाबर आझमच्या पाठीवर थाप मारत शुभेच्छा दिल्या. तसेच बाबर आझमनेही शुभेच्छा दिल्या. त्यामुळे या हृदयस्पर्शी क्षणाचा फोटो आणि व्हिडीओ क्रिकेटच्या अनेक चाहत्यांनी त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केल्याचं पाहायला मिळत आहे. विराट कोहली आणि बाबर आझम यांचा हा फोटो व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. याबाबत एका युजरने असं लिहिलं की’मैत्री’ तर दुसऱ्याने लिहिलं की, “म्हणूनच आम्हाला कोहली आवडतो”.
Picture of Day ?
Babar Azam and Virat Kohli. #PAKvIND #ChampionsTrophy #INDvsPAK#ViratKohli pic.twitter.com/N6XPNFicD3This quiz is AI-generated and for edutainment purposes only.— Subash (@SubbuSubash_17) February 23, 2025
दरम्यान, पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचा आयोजक देश आहे. मात्र बीसीसीआयने भारतीय संघ पाकिस्तानमध्ये खेळणार नाही असा पवित्रा घेतल्याने हायब्रिड प्रारुप स्वीकारण्यात आलं. भारतीय संघाचे सामने दुबईत होत आहेत.उर्वरित सामने पाकिस्तानात होत आहेत.