Asia Cup 2025 final Jasprit Bumrah Farhan Fight video: भारत आणि पाकिस्तान यांच्यात आशिया चषक २०२५ चा अंतिम सामना खेळवला जात आहे. हा सामना चांगलाच अटीतटीचा होत आहे. पाकिस्तानने या सामन्यात चांगली फलंदाजी केली, पण नंतर भारतीय गोलंदाजीसमोर त्यांचा डाव कोसळला आणि संघ १४६ धावांवर सर्वबाद झाला. यादरम्यान सामन्याच्या सुरूवातीलाच जसप्रीत बुमराह आणि पाकिस्तानचा सलामीवीर फरहान यांच्याकत वाद झाला होता.

डावाच्या सुरुवातीला पाकिस्तानी सलामीवीर साहिबजादा फरहान आणि भारतीय स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह यांच्यात बाचाबाची झाली. फरहानने आक्रमक फलंदाजी करत बुमराहच्या षटकात एक शानदार षटकार मारला, तेव्हा ही घटना घडली. त्यानंतर दोन्ही खेळाडू एकमेकांना रागाने काहीतरी बोलताना दिसले.

पाकिस्तानने नाणेफेक गमावली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. स्फोटक फलंदाजीसाठी ओळखले जाणाऱ्या साहिबजादा फरहानने बुमराहविरुद्ध निर्भयपणे फलंदाजी केली. त्याने बुमराहच्या एका षटकात केवळ धावाच केल्या नाहीत तर एक षटकारही खेचले. या षटकानंतर दोन्ही खेळाडूंमध्ये जोरदार वाद होताना दिसला. पण काहीच वेळात दोन्ही खेळाडू आपआपल्या जागी परत केले.

बुमराहविरुद्ध या स्पर्धेत साहिबजादा फरहानचा विक्रम उल्लेखनीय आहे. त्याने ३४ चेंडूत ५१ धावा केल्या आहेत, ज्यात सहा चौकार आणि तीन षटकारांचा समावेश आहे. त्याचा स्ट्राइक रेट १५० आहे आणि लक्षवेधी गोष्ट म्हणजे, बुमराह त्याला एकदाही बाद करू शकला नाही. टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात बुमराहविरुद्ध तीन षटकार मारणारा साहिबजादा फरहान हा जगातील एकमेव फलंदाज आहे, जो की मोठा विक्रम आहे.

आशिया चषकात भारत-पाकिस्तान दोन्ही संघांमध्ये जोरदार वाद होण्याची ही पहिलीच घटना नव्हती. सुपर ४ सामन्यादरम्यान अभिषेक शर्मा आणि शाहीन आफ्रिदी यांच्यातही जोरदार वाद झाला. या सामन्यादरम्यान हरिस रौफचा अभिषेक शर्माशीही वाद झाला होता. दरम्यान, यावेळी कोणत्याही सामन्यानंतर भारतीय संघाच्या खेळाडूंनी पाकिस्तानी संघाशी हस्तांदोलनही केलेले नाही.

पाकिस्तानचा संघ १४६ धावांवर सर्वबाद झाला आणि त्यानंतर धावांचा पाठलाग करणाऱ्या भारताला सामन्याच्या सुरूवातीलाच मोठे धक्के दिले. भारताच्या तीन मोठ्या फलंदाजांना पाकिस्तानी गोलंदाजांनी पॉवरप्लेमध्येच ३ विकेट्स घेतले. यामुळे भारतीय संघाला सावधपणे फलंदाजी करण्यासाठी भाग पाडलं. टीम इंडियाने पॉवरप्लेमध्ये फक्त ३ बाद ३६ धावा केल्या.