आशिया चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज लढत होत आहे. तब्बल एका वर्षाने हे पारंपरिक प्रतिस्पर्धी एकमेकांसमोर आले आहेत. या सामन्याची भारत-पाकिस्तान यांच्यासह जगभरातील क्रिकेट चाहते वाट पाहात होते. दरम्यान, मागील पराभवाचा या सामन्यात बदला घ्या, अशी इच्छा भारतीय संघाचे समर्थक व्यक्त करताना दिसत आहेत. तर पाकिस्तानी संघाने आपली विजयी पताका फडकवत ठेवावी, अशी आशा पाकिस्तानी संघाचे समर्थक व्यक्त करत आहेत. या सामन्याला घेऊन सोशल मीडियावर तर भन्नाट मीम्स शेअर केले जात आहेत.

हेही वाचा >>> भारत-पाक लढतीआधी क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का, भारताच्या धडाकेबाज खेळाडूने घेतली निवृत्ती

या वर्षी आशिया चषकाचे सर्व सामने यूएईमध्ये खेळवले जात आहेत. आजचा भरत-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी जगभरातील क्रिकेट रसिक यूएईमध्ये दाखल झाले आहेत. मैदानाबाहेर दोन्ही संघाचे समर्थक घोषणा देताना दिसत आहेत. याआधी भारत-पाकिस्तान संघ ऑक्टोबर २०२१ मध्ये टी-२० विश्वचषकादरम्यान आमनेसामने आले होते. या सामन्यात पाकिस्तानने भारताला दहा गडी राखून पराभूत केले होते. त्यामुळे तब्बल एका वर्षाच्या प्रतीक्षेनंतर हे पारंपरिक प्रतिस्पर्धी पुन्हा एकदा समोरासमोर असून यावेळी भारताने पराभवाचा वचपा काढावा, अशी आशा भारतीय क्रिकेट चाहते व्यक्त करत आहेत. तर आपली ही विजयी पताका पाकिस्तान संघाने अशीच कायम ठेवावी अशी इच्छा पाकिस्तान संघाच्या समर्थकांची आहे.

भारतीय संघाचे प्लेइंग इलेव्हन

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग</p>

पाकिस्तान संघाचे प्लेइंग इलेव्हन

बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), फखर जमान, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, आसिफ अली, शादाब खान, मोहम्मद नवाज, नसीम शाह, हरिस रौफ, शाहनवाज दहनी