India vs South Africa 2nd Test Match, Jasprit Bumrah: केपटाऊनमध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराहने अफलातून गोलंदाजी करत पाच विकेट्स घेतल्या. या दरम्यान, बुमराह क्षेत्ररक्षण करताना मोठ्या दुखापतीतून थोडक्यात बचावला. यानंतर तो लंगडत मैदानावर धावताना दिसला. समालोचन करताना इरफान पठाणने बुमराहच्या पायात त्रास होत असल्याबाबत चिंता व्यक्त केली. टीम इंडियाला आगामी वर्षात टी-२०चा विश्वचषक खेळायचा आहे, त्यामुळे जसप्रीत बुमराह संघात तंदुरुस्त असणे आवश्यक आहे.

केप टाऊनमध्ये दुसऱ्या दिवशी जसप्रीत बुमराहने आफ्रिकन फलंदाजांना चांगलेच अडचणीत आणले. त्याने यजमान संघाला एकापाठोपाठ धक्के दिले आणि त्यांचा संपूर्ण संघ १७६ धावांत सर्वबाद झाला. या डावात त्याने सहा विकेट्स घेत आफ्रिकन फलंदाजांना नाकेनऊ आणले. मात्र या दरम्यान, क्षेत्ररक्षण करताना, डायव्हिंग करताना बुमराहचा गुडघा जमिनीवर जोरात आदळला आणि त्याला थोडी दुखापत झाली.

sandeep sharma got emotional on unsold ipl 2024 auction after rr vs mi match
RR vs MI: “दोन वर्षांपूर्वी मला कोणी विकत घेतले नाही, पण…” मुंबई इंडियन्सच्या ५ विकेट घेतल्यानंतर संदीप शर्माने व्यक्त केली मनातील ‘ही’ भावना
Rohit Sharma Is My Captain Not Other Guy Hardik Pandya
“रोहित शर्माच्या सल्ल्यावरच MI च्या खेळाडूंचा..”, इरफान पठाणने सांगितला ‘त्या’ Video चा अर्थ; म्हणाला, “हार्दिकपेक्षा..”
IPL 2024 Gujarat Titans vs Delhi Capitals Match Updates in Marathi
IPL 2024: ‘तू वेडा आहेस का?’ लाइव्ह मॅचमध्ये आपल्याच संघातील खेळाडूवर कुलदीप यादव भडकला, पंतने असं शांत केलं प्रकरण; पाहा VIDEO
miller mathew
“दहशतवाद्यांना घरात घुसून मारू”, मोदींच्या वक्तव्यावर अमेरिकेची प्रतिक्रिया; म्हणाले, “भारत-पाक वादात आम्हाला…”

गोलंदाजीसाठी जेव्हा सिराज डावाच्या ३६व्या षटकात गोलंदाजी करायला आला तेव्हा चौकार थांबवण्यासाठी सीमारेषेकडे धावत असलेल्या बुमराहचा वेग अचानक कमी झाला आणि तो थोडा लंगडताना दिसला. मात्र, मुकेश कुमारने पटकन डायव्हिंग करून हा चेंडू अडवला. दरम्यान, कॉमेंट्री बॉक्समध्ये बसलेल्या इरफान पठाणने बुमराहच्या दुखापतीबद्दल चिंता व्यक्त केली. तो म्हणाला, “बुमराह ज्या प्रकारे चेंडूच्या मागे धावत होता ते चांगले चिन्हे भारतासाठी नाहीत. त्याने डाइव्ह मारली आणि त्याचा गुडघा अडकला, तेव्हापासून तो थोडासा लंगडत धावत आहे.”

भारताने मालिका ११ अशी बरोबरीत सोडवली

केप टाऊन कसोटी जिंकून भारताने इतिहास रचला. त्याने येथे प्रथमच कसोटी सामना जिंकला आहे. केप टाऊनमध्ये भारताचा हा सातवा कसोटी सामना होता. यापूर्वी सहापैकी चारमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. दोन कसोटी सामने अनिर्णित राहिले. भारताने केप टाऊन कसोटी जिंकून मालिकेतही १-१ अशी बरोबरी साधली. दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका ड्रॉ करण्यात भारताला यश मिळण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी २०१०-११मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली तीन कसोटी सामन्यांची मालिका १-१ अशी बरोबरीत संपली होती.

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा निर्णय चुकीचा ठरला. पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेचा संघ केवळ ५५ धावांवरच मर्यादित राहिला. त्यानंतर भारत १५३ धावांवर ऑलआऊट झाला. सामन्याच्या पहिल्याच दिवशी दोन्ही संघांचा पहिला डाव आटोपला. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी यजमानांनी दुसऱ्या डावात १७३ धावा केल्या. त्यामुळे भारताला ७९ धावांचे लक्ष्य मिळाले. तीन गडी गमावून त्याने हे लक्ष्य गाठले.

हेही वाचा: IND vs SA: जसप्रीत बुमराहच्या जबरदस्त गोलंदाजीपुढे दक्षिण आफ्रिका १७६ धावांत गारद, भारतासमोर ठेवले ७९ धावांचे लक्ष्य

दुसऱ्या डावात रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांनी भारताला दमदार सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ४४ धावांची भागीदारी केली. यशस्वीच्या रूपाने भारताला पहिला धक्का बसला. २३ चेंडूत २८ धावा करून तो बाद झाला. त्याने सहा चौकार मारले. आंद्रे बर्गरच्या चेंडूवर तो ट्रिस्टन स्टब्सकरवी झेलबाद झाला. भारताला दुसरा धक्का शुभमन गिलच्या रूपाने बसला. तो ११ चेंडूत १० धावा करून बाद झाला. कागिसो रबाडाने त्याला क्लीन बोल्ड केले. शुबमनने आपल्या खेळीत दोन चौकार मारले. विराट कोहली बाद होणारा तिसरा भारतीय फलंदाज ठरला. तो ११ चेंडूत १२ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. मार्को यान्सनच्या चेंडूवर यष्टिरक्षक काइल वेरेयनने झेल घेतला. रोहित शर्मा (१७ धावा) आणि श्रेयस अय्यर (४ धावा) यांनी सामना संपवला.