India vs South Africa 2nd Test Match Updates : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना केपटाऊनच्या न्यूलँड्स मैदानावर खेळवला जात आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता, परंतु भारतीय संघाच्या गोलंदाजांनी दमदार प्रदर्शन करताना एल्गरचा निर्णय चुकीचा ठरवला. मोहम्मद सिराजच्या वेगवान माऱ्यासमोर दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव ५५ धावांवर आटोपला.
केपटाऊन कसोटीत दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी मोहम्मद सिराजसमोर गुडघे टेकले. मोहम्मद सिराजने पहिल्याच सत्रात दक्षिण आफ्रिका संघाच्या ५ फलंदाजांना बाद करून इतिहास रचला आहे. त्याचबरोबर पहिल्या डावात एकूण सहा फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. त्याचबरोबर जसप्रीत बुमराहने दोन आणि मुकेश कुमारने दोन गडी बाद केले. दक्षिण आफ्रिकेकडून फलंदाजी करताना डेव्हिड बेडिंगहॅम (१२) आणि काइल व्हेरेने (१५) यांनी सर्वाधिक धावा केल्या. मात्र, दक्षिण आफ्रिकेच्या इतरा आठ फलंदाजाना दुहेरी आकडाही पार करताना आला नाही.
मोहम्मद सिराजने इतिहास रचला –
मोहम्मद सिराजने प्रथम एडन मार्करमला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. यानंतर डीन एल्गरला निरोप देण्यात आला. अशा प्रकारे दोन्ही सलामीवीरांना पॅव्हेलियनमध्ये पाठवण्यात आले. त्यानंतर मोहम्मद सिराजने डॉनी डी जोर्जी, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड बेडिंगहॅम, काइली वेरेयन आणि मार्को युनसेन यांना बाद केले. अशाप्रकारे मोहम्मद सिराजने पहिल्याच सत्रात ५ फलंदाजांना बाद करून मोठी कामगिरी केली.
दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव ५५ धावांवर आटोपला –
दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव ५५ धावांवर आटोपला. पहिल्या सामन्यात सामान्य दिसणाऱ्या भारतीय गोलंदाजांनी या सामन्यात अप्रतिम कामगिरी केली. मोहम्मद सिराजने सर्वाधिक सहा विकेट्स घेतल्या. जसप्रीत बुमराह आणि मुकेश कुमार यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. दक्षिण आफ्रिकेचे दोनच फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले. याशिवाय एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. एडन मार्करम (२ ), डीन एल्गर (४), टोनी डीजॉर्ज (२), ट्रिस्टन स्टब्स (३), मार्को जॅनसेन (०), केशव महाराज (१ ), कागिसो रबाडा (१), नांद्रे बर्जर (४) धावांवर बाद झाले.