भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात १९ जानेवारीपासून तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिले दोन सामने पार्लमध्ये, तर शेवटचा सामना केपटाऊनमध्ये खेळवला जाईल. यासाठी टीम इंडियाने तयारी सुरू केली आहे. टीम इंडियाचे खेळाडू पार्लच्या बोलंड पार्कमध्ये जमले आणि त्यांनी सराव सत्रात भाग घेतला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतीय खेळाडूंचे फोटो शेअर केले आहेत.

कसोटी कर्णधारपदावरून पायउतार झाल्यानंतर विराट कोहलीचे प्रथमच समोर आला आहे. यामध्ये तो विराट श्रेयस अय्यर आणि शार्दुल ठाकूरसोबत उभा आहे. एकदिवसीय मालिकेसाठी केएल राहुलला कर्णधार बनवण्यात आले आहे. रोहित शर्मा दुखापतीमुळे मालिका खेळत नाही. बीसीसीआयने शेअर केलेल्या फोटोंमध्ये राहुल भारतीय संघाशी संवाद साधताना दिसत आहे, तर विराटसह इतर खेळाडू त्याचे म्हणणे ऐकून घेत आहे.

हेही वाचा – ‘‘कर्णधारपद हा कुणाचा जन्मसिद्ध हक्क नाही”, गौतम गंभीरचं विराटबाबत ‘मोठं’ वक्तव्य!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वनडे कर्णधार म्हणून केएल राहुलची ही पहिलीच आंतरराष्ट्रीय मालिका आहे. याआधी जोहान्सबर्गमध्ये झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कर्णधारपद भूषवले होते, मात्र या सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला होता. दुखापतीमुळे कोहलीच्या अनुपस्थितीत तो कर्णधार झाला. केएल राहुलच्या कर्णधारपदाची खरी कसोटी वनडे मालिकेत असेल. याआधी त्याने आयपीएलमध्ये पंजाब किंग्जचे कर्णधारपद सांभाळले आहे.