भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील केपटाऊन येथे रंगत असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात आश्चर्यकारक घटना पाहायला मिळाली. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी २१२ धावांचे आव्हान दिले. प्रत्युत्तरात आफ्रिकेने एडन मार्करामला लवकर गमावले. पण कप्तान डीन एल्गर आणि कीगन पीटरसन यांनी अर्धशतकी भागीदारी करत संघाला मजबूत स्थितीत पोहोचवले. दरम्यान अश्विन टाकत असलेल्या २१व्या षटकात अशी घटना घडली, ज्यामुळे अंपायरसह सर्वांनाचा आश्चर्याचा धक्का बसला.

या षटकात अश्विनने एल्गविरुद्ध पायचीतचे अपील केले. पंचांनीही या अपीलचे स्वागत करत एल्गरला बाद ठरवले. अश्विनने टाकलेला चेंडू मधल्या यष्टीला लागत असल्याचे प्राथमिक अंदाजावरून सर्वांनाच वाटले. एल्गरने डीआरएस घेतला, यात चेंडू यष्ट्यांना लागतच नसल्याचे समोर आले आणि एल्गरला जीवदान मिळाले. हा डीआरएस पाहून अंपायरसह अश्विन आणि विराटलाही राग अनावर झाला.

अश्विन आणि विराटने जाणूनबुजून स्टम्प माइकच्या माध्यमातून आपला राग व्यक्त केला. ”तुम्हाला “तुम्हाला सुपरस्पोर्ट जिंकण्यासाठी अधिक चांगले मार्ग शोधले पाहिजेत”, असे अश्विनने म्हटले. तर विराटने “फक्त विरोधी नाही, तर तुमच्या संघावरही लक्ष केंद्रित करा. सर्वांच्या चुका पकडण्याचा प्रयत्न करा”, असे म्हटले. राहुचेही बोलणे स्टम्प माइकमधून ऐकू आले. ”संपूर्ण देश अकरा खेळाडूंविरुद्ध खेळत आहे”, असे राहुलने म्हटले.

हेही वाचा – IND vs SA : ऋषभ पंतचं शतक अन् रोहितचं कोड्यात टाकणार ट्वीट; बघा तुम्हाला मिळतंय का याचं उत्तर!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मैदानावर उपस्थित असलेले अंपायर इरास्मस यांनीही डीआरएसच्या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केले. ”हे अशक्य आहे”, असे इरास्मस म्हणाले. भारतीय खेळाडू या घटनेनंतर मैदानावर वक्तव्य करताना दिसून आले. विराट, पंतसह भारताचे खेळा़डू एल्गर आणि पीटरसनला टोमणे मारताना ऐकायला मिळाले. एल्गरला या जीवनादानाचा फायदा उचलता आला नाही. ३०व्या षटकात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने त्याला यष्टीपाठी झेलबाद केले. एल्गरने ३ चौकारांसह ३० धावा केल्या.