भारत आणि श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय आणि टी -२० मालिकेचे सुधारित वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर श्रीलंका क्रिकेट बोर्डाने सामन्याच्या वेळा जाहीर केल्या आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सांगितले, की भारत आणि यजमान श्रीलंका यांच्यातील वनडे आणि टी-२० मालिका श्रीलंकेच्या क्रिकेट संघाच्या शिबिरात करोनाच्या उद्रेकानंतर स्थगित करण्यात आली आहे. मात्र, ही मालिका रद्द केली गेली नव्हती. ही मालिका आता १८ तारखेपासून खेळली जाईल.

श्रीलंका संघाचे फलंदाजी प्रशिक्षक ग्रांट फ्लॉवर आणि डेटा विश्लेषक जीटी निरोशन यांना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे ही मालिका पुढे ढकलण्यात आली आहे. यापूर्वी वनडे मालिकेतील सामने दुपारी अडीज वाजता सुरू होणार होते. परंतु वेळापत्रकात बदल झाल्यानंतर हे सामने तीन वाजता सुरू होणार आहेत. टी-२० मालिकेतील सामने सात ऐवजी आठ वाजता खेळले जाणार आहेत.

 

हेही वाचा – ‘क्रांती’ चित्रपट बघू देत नाही म्हणून टीव्हीच उचलून घेऊन गेले होते यशपाल शर्मा!

वनडे मालिका

१) पहिला वनडे सामना – १८ जुलै
२) दुसरा वनडे सामना – २० जुलै
३) तिसरा वनडे सामना – २३ जुलै

टी-२० मालिका

१) पहिला टी – २० सामना – २५ जुलै
२) दुसरा टी-२० सामना – २७ जुलै
३) तिसरा टी -२० सामना – २९ जुलै

भारतीय संघ

शिखर धवन (कर्णधार), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्कल, ऋतुराज गायकवाड़, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, नितीश राणा, इशान किशन, संजू सॅमसन, यजुर्वेंद्र चहल, राहुल चहर, कृष्णप्पा गौतम, क्रुणाल पंड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, दीपक चहर, नवदीप सैनी आणि चेतन साकारिया.