Rohit Sharma century drought: तिरुअनंतपुरमच्या ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियमवर रविवारी श्रीलंकेवर विक्रमी विजय नोंदवत भारताने आणखी एक मालिका जिंकली. विराट कोहली आणि शुबमन गिल यांनी फलंदाजीत शतके झळकावली, तर मोहम्मद सिराज, शमी आणि कुलदीप यादव यांनी गोलंदाजीत चमक दाखवली. कर्णधार रोहित शर्मा ४२ धावा करून बाद झाला. भारताचा माजी सलामीवीर फलंदाज गौतम गंभीरने रोहितच्या फॉर्मवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रोहित शर्मा पुन्हा एकदा चांगल्या सुरुवातीनंतर त्याचे मोठ्या धावसंख्येत रूपांतर करण्यात अपयशी ठरला. यासह त्याच्या नावावर एक लाजिरवाणा विक्रम झाला. टीम इंडियाच्या कर्णधाराला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावण्यासाठी ५० हून अधिक डाव झाले आहेत. रोहित शर्माने शेवटचे शतक सप्टेंबर २०२१ मध्ये इंग्लंडविरुद्ध ओव्हल या मैदानावर झळकावले होते.

हेही वाचा: Babar Azam: बाबर आझम हनी ट्रॅपमध्ये अडकला! पाकिस्तानी कर्णधाराचा वैयक्तिक अश्लील Video व्हायरल, PCBची झाली अडचण

गौतम गंभीरचे रोहित शर्माच्या फलंदाजीवर केली टीका

श्रीलंकेविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात रोहित शर्मा ४९ चेंडूत ४२ धावा करून डीप स्क्वेअर लेगवर झेलबाद झाला होता. यानंतर टीम इंडियाचा माजी क्रिकेटर गौतम गंभीरने विराट कोहलीप्रमाणे रोहित शर्माबाबत कठोर वृत्ती अंगीकारण्याबाबत विधान केले. विराट कोहलीने तीन-साडेतीन वर्षे शतक झळकावले नाही तेव्हा त्याच्यावर बरीच टीका झाली. रोहित शर्माच्या बाबतीतही असेच घडले पाहिजे. तो कर्णधार आहे म्हणून त्याला स्पेशल ट्रीटमेंट म्हणजेच विशेष सवलत मिळणार नाही. जसा विराट कोहली तसाच रोहित शर्मा त्यामुळे त्या दोघांत मी कुठलाच फरक करणार नाही. रोहित आणि कोहली हे दोन्ही टीम इंडियासाठी विश्वचषक २०२३च्या दृष्टीने अधिक महत्वाचे आहेत.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५० डाव पुरेसे असतात

गौतम गंभीरने स्टार स्पोर्ट्सवर रोहित शर्माबाबत बोलताना म्हटले की, “मला वाटते की गेल्या साडेतीन वर्षांत विराट कोहलीने शतक किंवा मोठी खेळी केली नाही म्हणून आपण सर्वानीच त्याच्यावर खूप टीका केली होती.  जसे त्याच्याशी वागायचो तसेच आपण रोहितवर टीका केली पाहिजे. तो कर्णधार आहे तर bcciने देखील याबाबत लक्ष घालणे गरजेचे आहे. रोहित शर्माबाबत आपण तितकेच कठोर असले पाहिजे कारण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५० डाव पुरेसे असतात.”

हेही वाचा: Australian Open 2023: पहिलाच सामना खेळायला उतरला अन् चक्क रॅकेट गेली चोरीला; राफेल नदालसोबत अजबच घडलं, पाहा video

रोहित शर्माला मोठ्या धावसंख्येमध्ये रुपांतर करावे लागेल

गौतम गंभीर पुढे म्हणाला, “तुम्ही एक किंवा दोन मालिकांमध्ये शतक केले नाही असे नाही. गेल्या विश्वचषकापासून तुमची मोठी खेळी दिसली नाही. तो आधी मोठी शतके झळकावायचा. तो चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहे, चेंडू चांगला मारतो पण त्याला या गोष्टीचा फायदा घेऊन मोठ्या डावात रूपांतरित करावे लागेल. विराट कोहली आणि रोहित शर्मासाठी एक गोष्ट अडचणीची ठरली आहे. विराटने तो टप्पा पार केला असून विश्वचषकापूर्वी रोहित शर्माला यावर मात करावी लागणार आहे. हे दोन्ही खेळाडू विश्वचषकात भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे असतील.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs sl captain could not score a single century in 50 innings gautam gambhir raised questions on rohit said before the world cup avw
First published on: 16-01-2023 at 15:48 IST