scorecardresearch

‘‘मालिकेचा गेम चेंजर!”, करोनाग्रस्त कृणाल पंड्याबाबत नेटकऱ्यांनी दिल्या ‘अशा’ प्रतिक्रिया

भारत-श्रीलंकामधील दुसऱ्या टी-२० सामन्यापूर्वी कृणाल आढळला करोना पॉझिटिव्ह

‘‘मालिकेचा गेम चेंजर!”, करोनाग्रस्त कृणाल पंड्याबाबत नेटकऱ्यांनी दिल्या ‘अशा’ प्रतिक्रिया
कृणाल पंड्यावर लोकांच्या प्रतिक्रिया

श्रीलंका दौऱ्यावरील टीम इंडियाचा खेळाडू कृणाल पंड्या करोना पॉझिटिव्ह आढळला. त्यामुळे दोन्ही संघांत आज होणारा टी-२० सामना पुढे ढकलण्यात आला. बीसीसीआयने कृणालला करोनाची लागण झाल्याचे आणि हा सामना पुढे ढकलला गेल्याची माहिती ट्वीट करत दिली. चाहत्यांनी बीसीसीआयच्या या ट्वीटवर अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. कृणाल आणि त्याचा भाऊ हार्दिकने श्रीलंका दौऱ्यावर म्हणावी तशी चांगली कामगिरी केलेली नाही. त्यामुळे नेटकऱ्यांनी कृणालला करोना झाल्याचे कळताच त्याच्यावर मीम्स बनवले आहेत.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

बायो बबलमध्ये करोनाचा शिरकाव झाल्यामुळे दोन्ही संघांना आयसोलेट केले आहे. दोन्ही संघांतील खेळाडूंच्या चाचण्या निगेटिव्ह आल्या, तर हा सामना उद्या बुधवारी म्हणजेच २८ जुलैला खेळला जाईल. कृणालला करोनाची लागण झाल्यामुळे इंग्लंड दौऱ्यावर पाठवण्यात येणाऱ्या पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादवबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या