Ishan Kishan mocks Ajinkya Rahane: डॉमिनिका येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने वेस्ट इंडिजचा एकतर्फी पराभव केला. टीम इंडियाने हा सामना एक डाव आणि १४१ धावांनी जिंकला. या सामन्यात भारताकडून दोन खेळाडूंनी पदार्पण केले. ते दोन खेळाडू यशस्वी जैस्वाल आणि इशान किशन होते. यशस्वीने आपल्या पहिल्याच सामन्यात बॅटने शानदार कामगिरी केली आणि त्याला खूप प्रशंसा मिळाली. त्याचवेळी इशानला फलंदाजीची फारशी संधी मिळाली नाही पण तो विकेटच्या मागील आपल्या कृत्यांमुळे चर्चेत राहिला आहे.

भारतीय गोलंदाजांनी पहिल्या डावात विंडीजला १५० धावांत गारद केले. यानंतर यशस्वीच्या शतकाच्या जोरावर भारताने पहिला डाव ५ विकेट गमावून ४२१ धावांवर घोषित केला. या सामन्यात यशस्वीने १७१ धावांची खेळी केली. यशस्वीने या डावात ३८७ चेंडूंचा सामना केला आणि १६ चौकार, एक षटकार लगावला. या खेळीसाठी त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.

इशान रहाणेला काय म्हणाला?

तिसऱ्या दिवशी सामना संपताना विंडीजच्या फारशा विकेट्स शिल्लक नव्हत्या. भारताला विजयासाठी फक्त एका विकेटची गरज होती. तेव्हा इशानने संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेची खिल्ली उडवली. विंडीजचा ११व्या क्रमांकाचा फलंदाज जोमेल वॅरिकनने भारताची विजयाची प्रतीक्षा वाढवली आणि विकेटवर स्थिरावण्याचा प्रयत्न केला. त्याने १८ चेंडूत १८ धावा केल्या. यादरम्यान त्याने तीन चौकार मारले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्याची ही खेळी पाहून इशानने कसोटी संघाचा उपकर्णधार रहाणेला असे काही म्हटले की सगळेच हैराण झाले. इशान रहाणेला स्टंपच्या माइकवर सांगत होता की वॅरिकनने तुमच्यापेक्षा (रहाणे) जास्त चेंडू खेळले आहेत. यावेळी रहाणे स्लिपवर उभा होता आणि त्याने इशानला पुन्हा विचारले की, काय म्हणाला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रहाणेने या सामन्यात ११ चेंडूंचा सामना करत तीन धावा केल्या होत्या.