पहिल्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजने भारताला ८ गडी राखून धूळ चारली. शिमरॉन हेटमायर (१३९) आणि शे होप (१०२) यांनी ठोकलेल्या शतकांच्या जोरावर वेस्ट इंडिजने मालिकेत विजयी सलामी दिली. हेटमायर आणि होप यांच्या फटकेबाजीवर अंकुश लावणं कोणत्याही भारतीय गोलंदाजाला जमलं नाही. या दोघांनी द्विशतकी भागीदारी केली. त्यामुळे वेस्ट इंडिजने ४८ व्या षटकातच विजयावर शिक्कामोर्तब केले.

Video : बापरे..!! रोहितने मैदानावरच दिली पोलार्डला शिवी

सामन्याच्या ४८ व्या षटकात एक विचित्र किस्सा घडला. रवींद्र जाडेजाने चेंडू हळुवार टोलवला आणि एकेरी धाव घेण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी खेळाडूने अत्यंत चपळाईने चेंडू अडवला आणि चेंडू स्टंपवर फेकला. चेंडू थेट स्टंपवर आदळला पण जाडेजा क्रिजजवळ असल्याने मैदानावर फारसे अपील झाले नाही. विंडीजच्या रॉस्टन चेसने दबक्या आवाजात पंचांकडे अपील केले, पण पंचांनी ते अपील फेटाळून लावले. तिसऱ्या पंचांची मदत घ्यायचीही तसदी मैदानावरील पंचांनी घेतली नाही.

IND vs WI : “…म्हणून आम्ही हरलो”; विराटची प्रामाणिक कबुली

महत्त्वाचे म्हणजे, त्यानंतर मोठ्या स्क्रीनवर मात्र Action Replay दाखवण्यात आला. त्यात चेंडू स्टंपला लागलेला असताना जाडेजा क्रीजच्या बाहेर असल्याचे दिसून आले. त्यावेळी चेंडू टाकून बराच अवधी लोटला होता. पण पुढील चेंडू टाकण्यात आलेला नव्हता, त्यामुळे पोलार्डने पंचांच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यानंतर पंचांनी लगेच तिसऱ्या पंचांची मदत घेण्याचा निर्णय घेतला आणि तिसऱ्या पंचांनी त्याला बाद ठरवले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा घडलेला प्रकार भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या पचनी पडला नाही. त्यामुळे त्याने सीमारेषेवर येऊन पंचांबाबतची आपली नाराजी व्यक्त केली. पण फार काही न बोलता तो पुन्हा डग आऊटमध्ये परतला. या वादग्रस्त रन-आऊटबाबत सामन्यानंतर बोलताना विराट म्हणाला, “आमचा विचार अगदी स्पष्ट होता की खेळाडूने जेव्हा अपील केले तेव्हा पंच जाडेजाला थेट नाबाद ठरवून मोकळे झाले. तिथेच ते प्रकरण संपायला हवे. मैदानाच्या बाहेर असलेले लोक टीव्हीवर पाहून मैदानातील खेळाडूंना पंचांना निर्णयावर पुनर्विचार करायला सांगू शकत नाहीत. क्रिकेटमध्ये असं घडलेलं मी कधीही पाहिलेलं नाही. या घटनेत नियम कुठे गेले? मला प्रामाणिकपणे असं वाटतं की पंच आणि सामनाधिकारी यांनी या घडनेबाबत पुन्हा एकदा विचार करावा, म्हणजे पुन्हा क्रिकेटमध्ये असा प्रसंग आला तर काय करावे ते ठरवता येईल. मैदानाबाहेरील लोक मैदानावरील गोष्टींचा ताबा मिळवू शकत नाहीत असं माझं स्पष्ट मत आहे”, असे विराटने सांगितले.

दरम्यान, पहिल्या सामन्यात भारतावर पराभवाची नामुष्की ओढवली. भारताने प्रथम फलंदाजी करत २८७ धावांपर्यंत मजल मारली. पंतने ७१ तर अय्यरने ७० धावांची खेळी केली. या आव्हानाला उत्तर देताना हेटमायर आणि होप जोडीने भारताकडून अक्षरश: विजय हिसकावून घेतला.